वाहतूक कोंडी करणारे अतिक्रमित फलक जेसीबीने हटवले , विजापूर महामार्ग झाला मोकळा.
जनहिताचे कामे करणार, बेशिस्त वाहतुकीला लावणार शिस्त : - पो नि विनोद घुगे
24 मराठी न्यूज,.मोहोळ तालुका प्रतिनिधी ( राजेश शिंदे )
नेहमी वाहतुकीची कोंडी होऊन जड वाहनाखाली दुचाकीस्वार आणि पादचारी चिरडले जाणाऱ्या विजापूर महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी मोहोळ पोलीसांनी शिस्त लावण्या साठी प्रशासनाने पाऊल उचलले आहे वाहतुकीच्या कोंडीस कारणीभूत ठरणारे खाजगी व्यावसायिकांनी केलेले दोन्ही बाजूस अतिक्रमण करून लावलेले फलक जेसीबीने उखडून टाकण्यात आले आहेत . मोहोळ पोलिस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून पहिल्याच दिवसापासून शिवाजी चौक ते गवत्या मारुती मेन रोड वरील अंतर्गत वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नूतन पो नि विनोद घुगे यांनी ठोस भूमिका घेतल्याने धुमधड्याक्यात सुरुवात केली असून या कारवाईमुळे जन सामान्यात साहेबांची एक प्रतिमा शिष्त प्रिय अधिकारी अशी झाली आहे .मोहोळ – विजापूर रोड हा अपघातग्रस्त महामार्ग म्हणून ओळखला जातो . या मार्गाने जड वाहतूक होत असताना दोन वाहने या मार्गावरून जात नव्हती त्यामुळे दुचाकीला आणि पादचाऱ्यांना रस्ताच उपलब्ध नसतो . या ठिकाणी असलेल्या साईडपट्टी लगत अनेक व्यावसायिकांनी आपापले दुकानाचे मोठ मोठे फलक आणि दुकानातील साहित्य आणून ठेवल्याने हा मार्ग अरुंद झाला होता . त्यामुळे वाहनांचे ओव्हरटेकिंग होताना समोरून येणारी दुचाकी वाहने सर्रासपणे जड वाहनाखाली चिरडली जाऊन अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत .
स्वतः पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी या रस्त्यानी पाई जात सर्व व्यावसायिकांना सदरचे फलक काढून घेण्यासाठी काही दिवसांची तोंडी मुदत दिली होती . मात्र , तरीही सदरचे फलक न काढल्यामुळे पोलीस निरीक्षक घुगे यांनी जेसीबीच्या साह्याने पोलीस कर्मचाऱ्यांच्या समवेत सदरचे फलक काढून टाकले . त्यामुळे दहा वर्षानंतर प्रथमच या मार्गाने मोकळा श्वास घेतला आहे .
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७*