विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बैठक संपन्न.
24 मराठी न्यूज पंढरपूर प्रतिनिधी.
दिनांक 15 फेब्रुवारी, 2023पंढरपूर (ता.15):- श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीची सभा आज दिनांक 15 फेब्रुवारी, 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता मा.सह अध्यक्ष श्री.गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज (औसेकर) यांचे अध्यक्षतेखाली श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास, पंढरपूर येथे संपन्न झाली. सदरहू सभेस मा.सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे, श्री संभाजी शिंदे, ह.भ.प.शिवाजीराव मोरे हे समक्ष व ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), ह.भ.प.प्रकाश जवंजाळ, श्री अतुलशास्त्री भगरे गुरूजी हे दुरदृष्य प्रणालीद्वारे तसेच कार्यकारी अधिकारी श्री तुषार ठोंबरे, व्यवस्थापक श्री बालाजी पुदलवाड व लेखा अधिकारी श्री अनिल पाटील उपस्थित होते. सदर सभेत खालीलप्रमाणे निर्णय सर्वानुमते घेण्यात आले.1. पंढरपूर मंदिरे अधिनियम, 1973 मधील तरतूदीनुसार मंदिर समितीच्या सन 2023-2024 च्या अंदाजपत्रकास मान्यता देऊन मा धर्मादाय आयुक्त यांना सादर करण्याचे ठरले. त्यामध्ये रू. 587216000/- इतकी रक्कम जमा व रू. 329110289/- इतका खर्च अपेक्षित आहे.2. शासनाचे अनुकंपा धोरणानुसार / त्यांचे धर्तीवर तयार करण्यात आलेल्या नियमावलीस मान्यता देवून मा.धर्मादाय आयुक्त यांच्या मंजुरीसाठी सादर करण्याचे ठरले.3. श्री.विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास येथील तबक उद्यान योग्य त्या अटी व शर्तीवर रक्कम रु. ५०,०००/- इतके देणगी मुल्य आकारून भाडे तत्वावर उपलब्ध करून देण्याचे ठरले.4. मंदिर समितीचे विविध मे.न्यायालयात सुरू असलेल्या दाव्यांचे कामकाज पाहण्यासाठी पूर्णवेळ मानधन तत्वावर लॉ ऑफिसर नियुक्त करण्याचे ठरले.5. भाविकांना नित्यपुजा, पाद्यपुजा व चंदनउटी पुजा व्यतिरिक्त इतर कोणतीही पुजा उपलब्ध नाही, या तिन्ही पुजांना मिळणारा मोठ्या प्रमाणातील प्रतिसाद लक्षात घेता, भाविकांना यावर्षी गुडीपाडव्यापासून तुळशी पुजा उपलब्ध करून देण्याचे ठरले. त्याचे देणगी मुल्य, पुजेची संख्या व इतर अनुषंगीक माहिती लवकरच प्रसिध्द करण्यात येत आहे.6. भाविकांना श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी लाडूप्रसाद आऊटसोर्सिंग पध्दतीने खरेदी करून उपलब्ध करून देण्यात येतो. तथापि, पुरेसा व चांगल्या गुणवत्तेचा लाडूप्रसाद भाविकांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आऊटसोर्सिंग पध्दतीने खरेदी न करता, मंदिर समिती मार्फत तयार करून भाविकांना उपलब्ध करून देण्याचे ठरले.7. मंदिर समितीच्या जमिनी / मालमत्तांचे कामकाज पाहण्यासाठी गाव कामगार तलाठी व मंडळ अधिकारी शासनाकडून प्रतिनियुक्तीवर घेणे तसेच जमिनी विकसित करणे, अतिक्रमण होऊ नये, बेकायदेशीर वहिवाटू नये म्हणून सदर जमिनींचे पालकत्व संबंधित तालुक्याच्या तहसिलदारांस देणेबाबत शासनास प्रस्ताव सादर करण्याचे ठरले.8. मंदिर समितीचे कार्यालयीन कामकाज गतीमान करण्याच्या दृष्टीने प्रत्येक विभागातील एका लिपीक व लिपीक समकक्ष संवर्गातील कर्मचा-यांस सहायक विभाग प्रमुख पदाचा दर्जा देण्याचे ठरले.9. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर व भक्तनिवास येथे विद्युत व्यवस्थेकामी सोलर एनर्जी प्लान्ट बसविण्याचे ठरले.
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७*