स्वेरी कॉलेज विद्यार्थ्यां कडून मृदापरीक्षण व जलसंधारण जनजागृती.
24 मराठी न्यूज नेटवर्क
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या अंतर्गत असलेल्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी आंबे (ता. पंढरपूर) मध्ये जाऊन तेथील जमिनींची पाहणी व मृदा परीक्षण करून जलसंवर्धनाबाबत जनजागृती केली.’सिव्हिल इंजिनिअरिंग’ हे एक अभियांत्रिकीतील एक आव्हानात्मक क्षेत्र असून अलीकडे अनेक विद्यार्थ्यांचा कल हा सिव्हील इंजिनिअरींगकडे वाढत असल्याचे दिसून येते. भरपूर परिश्रम आणि त्यातून मिळणारे फळ यामुळे आज सिव्हील इंजिनिअरींग विभागाला चांगले दिवस आले आहेत. सध्याची परीस्थिती पाहता पाण्याचे स्रोत कमी होत आहेत आणि कांहीठिकाणी तर दुष्काळी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत पाण्याचा जपून वापर केला तर भविष्यातील वापरासाठी आपल्याला पाणी उपलब्ध होऊ शकते. आपण जसे धरणे बांधून पाणी साठवतो त्याच प्रमाणे आपण जमिनीत पाणी जिरवून पाण्याची जमिनीतील पातळी वाढवू शकतो. धरणे बांधण्यास खूप पैसे मोजावे लागतात, त्यासाठी भरपूर जागा लागते पण पाणी जिरविण्यासाठी आपल्याला उपलब्ध जमिनीचा उपयोग करून तांत्रिक दृष्ट्या बंडिंग करून पाणी जिरवता येते. बंडिंग करून पाणी जिरविण्यासाठी स्वेरीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आंबे येथे प्रत्यक्ष जावून जमिनीची समतलता तपासली. यालाच तांत्रिक भाषेत ‘कंटूर सर्वे करणे’ असे म्हणतात. त्यानंतर विद्यार्थ्यांनी याच ‘कंटूर सर्वे’ वरून जमिनीच्या उतारानुसार बंडिंग कसे केले जाईल व त्याद्वारे पाणी कसे साठवता येईल याबाबत तेथील ग्रामस्थांना मार्गदर्शन करून जनजागृती केली. पाण्यासोबतच मृदा संवर्धन करणे ही देखील काळाची गरज असून सध्या मृदासंधारण हे आपल्यासमोर एक मोठे आव्हान आहे. त्याचे कारण म्हणजे चांगल्या प्रकारची मृदा तयार होण्यासाठी लाखो वर्षे लागतात पण हीच मृदा जर उतारावर असेल तर ती पाण्याबरोबर वाहून जावून जमिनीची धूप होते आणि ती धूप थांबविण्याकरिता आपण जलसंवर्धन करण्यासाठी जे बंडिंग केलेलं आहे त्याचा उपयोग होऊ शकतो. बंडिंग मुळे साहजिकच पाण्याचा वेग मंदावतो. वेग कमी झाल्यामुळे जमिनीची धूप थांबते. अशा पद्धतीने आपण जल आणि मृदा संवर्धन केले तर आपोआप पाणलोट क्षेत्राचा विकास होईल. पुस्तकी अभ्यासाबरोबरच प्रात्यक्षिकावर देखील ‘स्वेरी’ कडून अधिक भर दिला जातो. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या नियोजनात्मक मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार यांच्या सहकार्याने व शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरींगचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार यांच्या नेतृत्वाखाली, प्रा. श्रीकृष्ण गोसावी, प्रा. योगेश सुरवसे, प्रा. समीर मस्के, प्रा. विश्वजीत सुरशेटवार प्रा. एच. आर. पवार, शिवानी बेणारे, ऐश्वर्या इंगोले व ऐश्वर्या लोकरे यांच्यासहसिव्हील इंजिनिअरींग विभागातील जवळपास ८५ विद्यार्थ्यांनी आवश्यक साहित्यांसह या उपक्रमात सहभाग घेतला. पुढे स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी आंबे येथील जिजामाता प्रशाला व भिमदादा सावंत कनिष्ठ महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना ‘मृदा आणि जलसंधारण’ याविषयी मार्गदर्शन केले. तेथील विद्यार्थ्यांनी देखील कुतूहलाने अनेक प्रश्न विचारले असता स्वेरीचे प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी पाणी, माती, जमीन, समतलपणा, उत्तरे दिली. , जमिनीची धूप आदी बाबतच्या प्रश्नांची समर्पक पणे उत्तरे दिले
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७*