खंडित केलेल्या ग्राहकांची थकबाकी वाढली .. वीज कनेक्शन मात्र सुरूच.
पंढरपूरचे कार्यकारी अभियंता संजय गवळी यांचे तडकाफडकी निलंबन.
24 मराठी न्यूज,पंढरपूर श्री विनोद पोतदार
महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांमुळे महावितरण कंपनी दिवाळखोरीत निघू लागली आहे. महावितरण कंपनीच्या वरिष्ठ पातळीवरून याची गंभीर दखल घेतली गेली आहे. म्हणूनच पंढरपूर महावितरण कंपनीचे कार्यकारी अधिकारी संजय गवळी यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे.महावितरण कंपनीचे संचालक संजय ताकसांडे यांनी निलंबनाचे पत्र १४ फेब्रुवारी रोजी काढले असून, पुढील आदेश होईपर्यंत संजय गवळी यांचे निलंबन कायम राहणार आहे. निलंबन काळात आठवड्याच्या दर सोमवारी आणि शुक्रवारी अभियंता पुणे ग्रामीण यांच्यापुढे सकाळी १० वाजता हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंढरपूर विभागात झालेल्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करणे गरजेचे आहे, याकरिता संजय गवळी यांनी पदावर राहणे चौकशीस बाधा आणणारे ठरणारे आहे, यामुळे हे निलंबन क्रमप्राप्त असल्याची माहिती संजय ताकसांडे यांनी दिली आहे.महावितरण कंपनीत भोंगळ कारभार सुरू असल्याची टीका कायमच होत असते. सांघिक कार्यालय स्तरावरून खंडित केलेल्या ग्राहकांची थकबाकी ४,०७० कोटी रुपये असल्याचे आढळून आले आहेत. मागील दोन वर्षात एकूण १०.३० लाख शेतकऱ्यांची वीज कनेक्शन खंडित करण्यात आली आहेत. त्यांच्याकडे एकूण १३५७ कोटी रुपये थकबाकी आहे
याकरता पंढरपूर विभागात ७ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत तपासणीसाठी अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या होत्या. यानुसार पडताळणी केली असता, या विभागात ज्या शेतकऱ्यांची वीज खंडित करण्यात आली आहे, अशा ६२ शेतकऱ्यांची वीज कनेक्शन मीटरद्वारे अथवा दुसऱ्या जोडणीद्वारे सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब अतिशय गंभीर असून महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सहभागाशिवाय ही कृती होणे शक्य नाही. याप्रकरणी संजय गवळी हेच जबाबदार असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे.चौकट*चौकशीत आणखी घोटाळा बाहेर येणार*महावितरण कंपनीत अधिकाऱ्यांनी नंगानाच चालवला आहे. शेतकऱ्यांकडून पैसे उकळून त्यांना कागदोपत्री थकबाकीदार दाखवले जात आहे. पुन्हा कनेक्शन जोडून देत त्यांच्याकडून पुन्हा पैसा उकळला जात आहे. महावितरण कंपनी मात्र चेंगरली जात आहे. पंढरपूर विभागात अशी अनेक प्रकरणे चौकशी दरम्यान बाहेर निघणार आहेत. संजय गवळी यांचे निलंबन झाले तरी, इतर अधिकारी जे प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या संपर्कात आहेत, ते शेतकऱ्यांच्या हातापाया पडून परिस्थिती काबूत ठेवण्याचा प्रयत्न करणार आहेत. याकडे शेतकरी बंधूंनी सजगतेने पाहणे गरजेचे आहे.
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७*