आय.सी.एम.एस कॉलेजमध्ये आय.टी क्षेत्रातील नोकरीच्या संधी सेमिनार संपन्न.
श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित,
24 मराठी न्यूज,पंढरपूर प्रतिनिधी: संपत लवटे
श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित, इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट स्टडीज,कासेगाव पंढरपूर या महाविद्यालयामध्ये आय.टी क्षेत्रातील नोकरीच्या संधी सेमिनार संपन्न झाला. सदर सेमिनारमध्ये बी.सी.ए व बी.एस्सी. (ईसीएस)भाग -२ व ३ मधील द्वितीय व तृतीय वर्षाच्या १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. आय.टी क्षेत्रात असणारे शिक्षणाचे फायदे,शिक्षणासाठी व नोकरीसाठी जाण्याची प्रक्रिया,पात्रता,नोकरीच्या संधी, आय.टी झपाट्याने वाढणारे क्षेत्र आहे.ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी आहेत. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट पासून ते डिजिटल मार्केटिंग आणि UI UX डिझाईनपर्यंत प्रत्येकासाठी काहीतरी आहे.तुम्ही तुमच्या करिअरमध्ये नुकतीच सुरुवात करत असल्यास किंवा बदल करण्याचा विचार करत असल्यास तुम्हाला नोकरीच्या वेगवेगळ्या संधी किंवा मार्ग कशा प्रकारे मिळतील याविषयी सविस्तर मार्गदर्शन प्रा.गोरख खरात (कोड फस्ट,पुणे कंपनीचे प्रमुख) यांनी केले
अशी माहिती महाविद्यालयाच्या कॅम्पसप्रमुख डॉ.जयश्री भोसले व प्राचार्य डॉ.ए.एस.भोईटे यांनी दिली. तसेच महाविद्यालयाच्या कॅम्पसप्रमुख डॉ.जयश्री भोसले यांच्या हस्ते प्रा.गोरख खरात यांचा सत्कार करण्यात आला.सदर सेमिनार पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट प्रमुख व विभाग प्रमुख प्रा.मुकुंद चौगुले व सहकारी प्रा.दिनेश पवार, शैक्षणिक सहाय्यक प्रा.कांचन नलवडे तसेच सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आहे.हा परिसंवाद यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे,अध्यक्ष एच.एम.बागल,उपाध्यक्ष बी.डी.रोंगे,खजिनदार दादासाहेब रोंगे यांनी अभिनंदन केले आहे.
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७*