पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी.
24 मराठी न्यूज पंढरपूर प्रतिनिधी श्री नंदकुमार देशपांडे
पंढरपूर, दि.19,:- पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 393 व्या जयंतीच्या निमित्ताने नगरपरिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी गजानन गुरव यांच्या शुभहस्ते शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन व अभिवादन करुन साजरी करण्यात आली.
यावेळी जय जिजाऊ , जय शिवराय जयघोषांनी परिसर दुमदुमला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त माजी आमदार दत्तात्रय सावंत, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, गट विकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी सुनिल वाळुंजकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच माजी नगराध्यक्ष साधनाताई भोसले, माजी उपनराध्यक्ष नागेश भोसले, युटोपियन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक तसेच मान्यवर पदाधिकारी, माजी नगरसेवक यांनीही अशावरुढ पुतळ्यास पुष्पहार आर्पण करुन अभिवादन केले. यावेळी ‘महाराष्ट्राचे राज्यगीत’ रेडिओ स्टार दिलीप टोमके व सहकारी यांनी गायले. यावेळी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७*