लोकसहभागातून बांधण्यात आलेल्या नवीन मंडळ अधिकारी कार्यालयाचे लोकार्पण.
प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते लोकार्पण
24 मराठी न्यूज करकम प्रतिनिधी
पंढरपूर दि, 19 :- करकंब (ता.पंढरपूर) पंढरपूर येथील ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून बांधण्यात आलेल्या मंडळ अधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचा लोकार्पण आज दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी शिव जयंतीचे औचित्य साधून प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते करण्यात आले. लोकसहभागातून बांधण्यात आलेल्या मंडळ अधिकारी कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्या निमित्त तहसीलदार सुशील बेल्हेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारू, उपसरपंच आदिनाथ देशमुख, मंडळधिकारी जगन्नाथ कुंभार, तलाठी निलेश कुंभार, कोतवाल बिरु शिंदे, पांडुरंग वाघमारे, भगवान अडगळे, करकंब गावचे ग्रामस्थ, ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते
मंडळ अधिकारी कार्यालयाच्या इमारतीमध्ये प्रवेश सेवानिवृत्त कोतवाल गुलाब कोरबू यांचे हस्ते फीत कापून करण्यात आला. या इमारतीची पायाभरणी सन 2022 रोजी गुढी पाडव्याच्या शुभमुहर्तावर करण्यात आला होता.
या इमारतीच्या बांधकामासाठी 5 लाख 7 हजार 500 रुपये इतका खर्च झालेल्या असून, इमारतीच्या क्षेत्रफळ 521 चौ फूट इतके आहे इमारतीमध्ये स्वच्छ पाणी, स्वच्छता गृह आदी सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. मंडळ अधिकारी कार्यालय बांधण्यासाठी मंडळ अधिकारी चंद्रकांत ढवळे, प्रभारी तलाठी दादा पाटोळे, चंद्रकांत उंबरदंड यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महसूल सहाययक राजू शिंदे यांनी केले.
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७*