राज्यव्यापी काम बंद आंदोलना मध्ये पंढरपूर नगरपालिका व सोलापूर जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायत मधील सर्व कर्मचारी संपावर.
24 मराठी न्यूज पंढरपूर (प्रतिनिधी) श्री प्रकाश इंगोले
महाराष्ट्र राज्य नगरपंचायत नगर परिषद कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या व फेडरेशन च्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रातील शासकीय कर्मचारी महानगरपालिका नगरपालिका कर्मचारी राज्यव्यापी काम बंद मध्ये सहभागी झाले आहेत त्यामध्ये पंढरपूर नगर परिषदेचे सर्व कर्मचारी संपात सामील झाले असल्याची माहिती राज्याचे जनरल सेक्रेटरी अँड.सुनील वाळूजकर यांनी दिलीयावेळी बोलताना अँड.सुनिल वाळूजकर यांनी सांगितले की,महाराष्ट्रातील महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत कर्मचारी व राज्य शासकीय कर्मचारी संघटना यांच्या वतीने जुनी पेन्शन योजना लागू करावी, कंत्राटी हंगामी कर्मचारी यांना सेवेत कायम करावे, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समान कामाला समान वेतन द्यावे व तोपर्यंत किमान वेतन देण्याची कारवाई करावी, सन २०१५ पासून नवीन स्थापन झालेल्या नगरपंचायत मधील उद्घोघोषणे पूर्वीचे व उद्घोघोषणे नंतरचे सर्व कर्मचारी व सफाई कर्मचारी यांचे विनाशर्त विना अट समावेशन करावे.
नवीन नगरपंचायतीमधील सफाई कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध मंजूर करावा, नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी यांना दहा वीस तीस ची आश्वासित प्रगती योजना लागू करावी, अनुकंपाची भरती त्वरित करावी व इतर मागण्यासाठी राज्य शासकीय कर्मचारी व महानगरपालिका, नगरपालिका.नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आज दिनांक १४ मार्च २०२३ पासून राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येत आहे यामध्ये सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील १८ लाख कर्मचारी या संपात सामील झाले आहेत तसेच सोलापूर जिल्ह्यातील १७ नगरपंचायत व नगरपरिषदेमधील सर्व कर्मचारी संपात सहभागी झाले आहेतशासनाने वेळीच मागण्या मान्य केल्यास वेळ पडल्यास अत्यावश्यक सेवा सुद्धा बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल
असे अँड.सुनिल वाळूजकर यांनी सांगितले हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे सहकार्याध्यक्ष शरद वाघमारे अखिल भारतीय मजदूर सफाई काँग्रेस संघटनेचे अध्यक्ष गुरू दोडिया, नागनाथ तोडकर उपाध्यक्ष संतोष सर्वगोड, किशोर खिलारे जयंत पवार,अनिल गोयल, प्रीतम येळे,तनुजा सीताफ,दत्तात्रय चंदनशिवे,संजय माने,सुनिल सोनार, महावीर कांबळे, दशरथ यादव, दर्शन वेळापुरे, पराग डोंगरे, नवनाथ पवार,अनिल अभंगराव, नगररचनाकार स्वप्नील डोके,सोमेश धट, अग्निशमन अधिकारी संभाजी कारले सर्व सफाई कर्मचारी व कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७