वाळुचोरट्यांनी चंद्रभागेत पाडलेले खड्डे विविध रंगात रंगले !
अंकुशराव यांचे वाळुचोरी विरुध्द आणखी एक हटके आंदोलन
24 मराठी न्यूज पंढरपूर श्री नंदकुमार देशपांडे
चंद्रभागेच्या पात्रातील वाळुचोरीच्या विरुध्द यल्गार करणारे पंढरीतील समाजसेवक, महर्षी वाल्मिकी संघाचे गणेश अंकुशराव यांनी आज वाळु चोरीच्या विरुध्द आणखी एक हटके आंदोलन केले. रंगपंचमीनिमित्त त्यांनी चक्क वाळु चोरट्यांनी वाळु नेऊन पडलेल्या खड्ड्यांमध्ये विविध रंग टाकुन अनोखी रंगपंचमी साजरी केली.गेल्या अनेक वर्षांपासुन अधिकृत वाळुचा लिलाव बंद असुनही चंद्रभागेच्या पात्रातुन सर्रासपणे वाळु चोरी होताना आढळुन येत आहे. यामुळे चंद्रभागेच्या पात्रात ठिकठिकाणी अनेक मोठमोठे खड्डे पडलेत. या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने चंद्रभागेचे पवित्र स्नान करताना अनेक भाविकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याविरुध्द समाजसेवक गणेश अंकुशराव हे सातत्याने विविध आंदोलनं करुन शासनाचे व प्रशासनाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु अद्यापही शासन याकडे गांभीर्याने पहात नसून प्रशासकीय अधिकार्यांच्या आशिर्वादाने बिनदिक्कत वाळु उपसा सुरुच आहे. गणेश अंकुशराव यांनी मात्र आपला वाळु चोरीच्या विरोधातील लढा सुरुच ठेवला असुन जोपर्यंत येथील वाळुचोरी संपुर्णपणे थांबत नाही तोपर्यंत याविरुध्द आवाज उठवणारंच असा निर्धार करत, त्यांनी आज वरीलप्रमाणे चंद्रभागेच्या पात्रात अनोखी रंगपंचमी साजरी केली. आज रंगपंचमी खेळली उद्या बेजबाबदार प्रशासकीय अधिकार्यांच्या कार्यालयात जाऊन आमच्या स्टाईलने परंतु लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करावे लागेल. असा इशारा यावेळी गणेश अंकुशराव यांनी दिला.यावेळी गणेश अंकुशराव, सुनील कोताळकर, शंकर अभंगराव, सोमनाथ कोरे, तुकाराम अंकुशराव, नंदु नेहतराव, बापु करकमकर, दत्ता सगर, सचिन अधटराव, अक्षय करकमकर, सोपान अंकुशराव, पिंटू करकमकर, हर्षद अभंगराव आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७*