विधिमंडळ सभागृहातील भाषणाने आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वसाधनेचे सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव.
24 मराठी न्यूज पंढरपूर (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य विधिमंडळ विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन – २०२३ अर्थसंकल्पावर बोलताना पंढरपूर – मंगळवेढा मतदार संघाचे आमदार मा. समाधानदादा आवताडे यांनी अतिशय अभ्यासपूर्ण भाषणामध्ये विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या तरतुदी त्याचबरोबर राज्यातील विविध समाज घटकांच्या विकासासाठी तयार केलेल्या महामंडळाची निर्मिती यावर सखोल पणे आपले विचार मांडले. संपूर्ण राज्यातील सामाजिक, राजकीय आर्थिकदृष्ट्या अतिशय महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील असणाऱ्या बळीराजाच्या मालाला योग्य हमीभाव व रास्त बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने कृषी धोरणासंदर्भात सत्ताधारी सरकारने केलेल्या भरीव तरतुदी याबद्दल सुंदर मनोगत व्यक्त केले आहे.
सदर भाषणामध्ये आपले विचार मांडताना आमदार महोदय यांनी विविध रूपक उपमा, आपल्या धार्मिक आणि आध्यात्मिक पार्श्वभूमी असणाऱ्या मतदारसंघाच्या सांप्रदायिक अभंग, संत वचने, यांची सात्विक विचारसरणीची पेरणी आपल्या भाषणामध्ये केली. त्याचबरोबर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवविचारांचा वसा आणि वारसा डोळ्यासमोर ठेवून राज्यातील सत्ताधारी मंडळी राज्याचा गाडा हाकत आहेत याबद्दल आमदार समाधान आवताडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार व्यक्त केले.विधिमंडळामध्ये आपले आमदारकीची पहिलीच टर्म असणाऱ्या आमदार मा.समाधान दादा आवताडे मतदार संघातील प्रश्नांच्या अनुषंगाने आपल्या विचारातून विविध कंगोऱ्यांना अतिशय सखोल पणे व समर्पक भावनेने हात घालून धोरणात्मक विचारांची मांडणी केल्याबद्दल उपस्थित विधिमंडळातील सर्व सदस्यांनी आमदार महोदय यांचे विशेष कौतुक केले आहे. शांत, संयमी आणि सूक्ष्म निरीक्षणाच्या माध्यमातून अभ्यासू वृत्ती आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये निर्माण करणाऱ्या आमदार समाधान आवताडे यांच्या भाषणानंतर अभ्यासू नेते शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार कै केशवराव धोंडगे यांच्या भाषणाची उपस्थितांना आठवण झाली.कमी बोलणे आणि जास्त कृतीवर भर देणे अशी व्यक्तीसाधना असणाऱ्या व सर्वच पक्षातील राजकीय मंडळींबरोबर सलोख्याचे संबंध असणाऱ्या पंढरपूर आणि मंगळवेढा देवभूमी व संतभूमीतील या व्यापक कार्यविस्ताराच्या लोकप्रतिनिधीच्या विचार मांडणी कौशल्यावर सभागृहातील प्रत्येक सदस्य आणि सन्माननीय विधानसभा अध्यक्ष जाम खुश झाल्याचे चित्र यावेळी स्पष्टपणे जाणवत होते.राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी व सर्वसामान्य जनतेच्या, शेतकऱ्यांच्या प्रगतशील धोरणासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली विकासाची वाट महाराष्ट्र राज्याला प्रगतीच्या आगळ्यावेळ्या शिखरावर पोहोचवेल याबद्दल आमदार समाधान आवताडे यांनी सत्ताधाऱ्यांचे तोंडभरून कौतुक केले. भारत देशाची दक्षिण काशी असणाऱ्या पंढरीचा काया पालट करण्यासाठी व पंढरीच्या दिशेने येणारे रस्ते महामार्ग सक्षम करण्यासाठी सत्ताधारी राज्य सरकारने नेहमीच भरीव मदतीचा हात पुढे केला आहे. देशातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी पंढरपूर या तीर्थक्षेत्रालाही तसाच लौकिक आणि वैभव प्राप्त व्हावे यासाठी सरकारने वेळोवेळी मदत केल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी आवर्जून नमूद केले. अनेक संतांच्या वास्तव्याने आणि अस्तित्वाने पुणे ते पावन झालेल्या मंगळवेढा संतभूमीचा साजेसा गौरवशाली इतिहास आपल्या कार्यातून आणि कृतीतून आणखी अधोरेखित व्हावा यासाठी मंगळवेढा शहर व तालुक्याच्या संत परंपरेचा वास आणि वारसा समृद्ध करण्यासाठी माय बाप सरकार हे नेहमीच तयार असतात असेही आमदार आवताडे यांनी यावेळी बोलून दाखवले. राज्यातील या सर्व समाधानकारक कार्यपद्धतीबद्दल आमदार समाधान आवताडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ महोदयांचे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीने विशेष अभिनंदन आणि धन्यवाद व्यक्त केले.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७