लाचखाऊ पोलीस पाटलावर कारवाई करा- शिखर शिंगणापूरच्या अमोल शेंडे यांचे प्रांताधिकार्यांना निवेदन
24 मराठी न्यूज दहिवडी प्रतिनिधी
दहिवडी : ता.१४ मार्चशिखर शिंगणापूरच्या पोलीस पाटलांवर कारवाई करण्याची मागणी शिंगणापूरच्या अमोल शेंडे यांनी प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्याकडे तक्रार अर्जाद्वारे केली आहे. सदर तक्रार जात त्यांनी म्हटले आहे की संतोष बोराटे हे 2018 सालापासून शिखर शिंगणापूरचे पोलीस पाटील म्हणून कार्यरत आहेत. परदेशी जाण्यासाठी ऑनलाईन पासपोर्ट अर्ज केल्यानंतर दहिवडी पोलिसांनी गावचे पोलीस पाटील यांच्याकडून रहिवासी व चांगल्या वर्तणूकीचा दाखला आणण्यास सांगितले होते.
त्यानुसार पोलीस पाटील संतोष बोराटे यांच्याकडे ०९/०३/२०२३ रोजी समक्ष भेटून दाखल्याची मागणी केली असता स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करत आरेकारेच्या भाषेत दाखला हवा असेल तर मला शंभर रुपये खर्च द्यावा लागेल असे म्हटल्याचे सांगितले आहे. पैशाबाबत विचारणा केली असता अंगावर धावून ये तू रहिवासी दाखला व चांगल्या वरतून नक्कीच दाखला मिळवून दाखव कोणत्याही कार्यालयामध्ये जा माझं कोणीच काही बिघडवू शकत नाही अशा शब्दात दमदाटी व शिवीगाळ केल्याचा आरोप अमोल शेंडे यांनी सदर तक्रार अर्जात केला आहे. करण शिंगणापूरचे पोलीस पाटील संतोष बोराटे यांच्यावर लाच मागितल्या प्रकरणी व अधिकाराचा गैरवापर केल्याप्रकरणी कडक कारवाईची मागणी अमोल शेंडे यांनी प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांना लिहिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७*