जिल्ह्यामध्ये,कैकाडी, टकारी, पामलोर, पास्थींसह १४ जातींच्या लोकांसाठी घरकुल योजना राबवा.
आ. प्रणिती शिंदे यांची विधानसभेत मागणी; यंत्रमाग कामगार कल्याण मंडळाची कार्यवाही सुरु करावी
24 मराठी न्यूज सोलापूर / प्रतिनिधी श्री प्रकाश इंगोले
सोलापूर जिल्ह्यामध्ये कैकाडी, टकारी, पामलोर, पारधींसह एकूण १४ जातींची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्याकरीता एकपण घरकूल योजना राबविण्यात आलेली नाही. रमाई आवास योजनेच्या धर्तीवर त्यांच्यासाठी घरकूल योजना राबविण्यात यावी. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये या १४ जाती असून त्यांच्याकरीता घरकूल योजना येत्या सहा महिन्यात राबवावी, अशी मागणी आ. प्रणिती शिंदे यांनी केली.सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात बोलताना त्यांनी विविध मागण्या केल्या. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जो अर्थसंकल्प सादर केला. त्यात असंघटीत कामगार संघटना असा उल्लेख केला आहे. गेल्या सरकारने यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळाची वेगळी सुतावर १ टक्का सेस लावून स्थापना करण्यात आली होती. जसे बांधकाम कामगार कल्याण मंडळाची स्थापना केली. या पध्दतीने असंघटीत कामगारांकरीता मंडळ स्थापन करावे, जेणेकरून कामगारांचा प्रश्न कायमस्वरुपी सुटेल.सोलापूर शहरामध्ये श्रीकला टेक्सटाईल्स, बालाजी मिल, दत्तू दुभाष तसेच शहरामधील संयुक्त झोपडपट्टी, न्यु पाच्छा पेठे येथील उमेश ऊर्फ उमाशंकर गालय्या कामुनी यांचे पत्राशेड मध्ये भाड्याने असणाऱ्या चिरंजीवी शेट्टी यांचा गणपती मुर्ती कारखाना, गड्डम यांचा टॉवेल कारखाना यांचा उल्लेख नाही. या कारखान्यामध्ये ५०० ते ६०० कामगार गेल्या ६ महिन्यांमध्ये बेरोजगार झालेले आहेत. या कामगारांकरीता शासनाच्यावतीने पर्यायी योजना करावी, असेही आ. शिंदे म्हणाल्या.
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७*