समृद्धी ट्रॅक्टर पंढरपूर येथे लकी ड्रॉ मोठ्या उत्साहात संपन्न.
24 मराठी न्यूज प्रतिनिधी पंढरपूर/-
सतत शेतकऱ्यांच्या हिताची व ग्राहक हिताची योजना राबवणारे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या समृध्दी ट्रॅक्टर्स पंढरपूर शोरूम येथे लकी ड्रॉ विजेत्यांना बक्षीसाचे वितरण चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.समृध्दी ट्रॅक्टर्स येथे विविध सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या लकी ड्रॉ योजनेतील विजेत्यांना बक्षीस वितरण श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत आबा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विजेत्या शेतकऱ्यांना मोटार सायकल, वॉटर सोलर आणि सोन्याच्या नाण्यांचे वितरण करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यातील अग्रगण्य ट्रॅक्टर विक्री शोरुम समृध्दी ट्रॅक्टर्स येथे विविध सण, उत्सव यांचे निमित्त साधून अनेक उपक्रमांचे आयोजन केले जात असते. विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत, जांबुवंत गंगाराम गोडसे, जुंजारपुर, मोटारसायकल विजेतेअजय भगवान घाडगे, देगाव, मोटारसायकल विजेतेदिनकर कुबेर खिलारे, वाकीशिवणे, वॉटर सोलर विजेते सिंदू परमेश्वर ढगे, निंबोणी, वॉटर सोलर विजेतेनितीन नामदेव पालकर, शिरबावी, वॉटर सोलर विजेतेदत्तात्रय महादेव राऊत, वाखरी, वॉटर सोलर विजेतेसुनील उत्तम पाटील, मरवडे, ५ ग्रॅम सोने विजेते अर्चना सुरेश मुकणे, बठाण, ५ ग्रॅम सोने विजेते संतोष शंकर खडतरे, हुन्नुर, ३ ग्रॅम सोने विजेते रामेश्वर शंकर आळसुंदकर, बागलवाडी, ५ ग्रॅम सोने विजेते प्रताप सुभाष भोसले, मेथवडे, ३ ग्रॅम सोने विजेते लिंगेश्वर प्रल्हाद वाघमारे, पुळूज, ५ ग्रॅम सोने विजेते अजय शंकर हिंगमिरे, गार्डी, २ ग्रॅम सोने विजेतेदत्तात्रय मच्छिंद्र आवताडे, भोसे, २ ग्रॅम सोने विजेते अनिल ज्ञानेश्वर कचरे, करकंब, २ ग्रॅम सोने विजेते म्हणून नावे जाहीर झाले आहेत.समृध्दी ट्रॅक्टर्स सलग ४ वर्ष सोनालीका ट्रॅक्टर विक्रीत महाराष्ट्रात पहिल्या स्थानी तर देशात दुसऱ्या स्थानी आहे. विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. २०१० पासून सेवेत कार्यरत असताना आजवर ग्राहककेंद्रित कामकाज आणि प्रत्येक शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर उपक्रम राबवत असल्याने शेतकऱ्यांचा मोठा ओढा समृध्दी ट्रॅक्टर्सकडे दिसून येत आहे.त्याच प्रमाणे येत्या गुढी पाडव्याच्या निमित्ताने देखील समृध्दी ट्रॅक्टर्सच्या वतीने सोनालीका ट्रॅक्टर खरेदी करा आणि जिंका हमखास बक्षिस ही लकी ड्रॉ योजना आयोजित केली आहे. १ मार्च ते ३१ मार्च दरम्यान हा लकी ड्रॉ असून यात पहिले बक्षिस एसी, दुसरे बक्षिस फ्रिज तर तिसरे बक्षिस कुलर देण्यात येणार आहे, विशेष म्हणजे या योजनेत ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला बक्षिस मिळणार आहे.यावेळी धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील, संचालक अभिजीत कदम, संचालक संतोष कांबळे, डीव्हीपी पीपल्स मल्टीस्टेटचे चेअरमन महादेव तळेकर, सोनालिका ट्रॅक्टर्स सुबोधकुमार , समृद्धी ट्रॅक्टरचे मॅनेजर श्री सोमनाथ केसकर, दादा पोरे व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७*