पंढरीत उद्योग जनजागृती शिबिराचे आयोजन.
24 मराठी न्यूज,पंढरपूर /प्रतिनिधी
16-3-23 सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकार खादी व ग्रामोद्योग आयोग व नामदार रामदासजी आठवले युवा मंच सोलापूर जिल्हा यांच्यावतीने प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत उद्योग जनजागृती शिबिराचे आयोजन येथील दाते मंगल कार्यालय सांगोला रोड पंढरपूर येथे दिनांक १७ मार्च २०२३ रोजी करण्यात आले
असल्याची माहिती कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष दिपक चंदनशिवे यांनी दिले आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. शिवाजी सावंत चेअरमन भैरवनाथ शुगर, शिवसेना संपर्कप्रमुख यांच्या हस्ते होणार असून माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून निदेशक / संचालक खादी व ग्रामोद्योग आयोग, मुंबई योगेश भामरे, आरपीआय मुंबई प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कासारे, प्रदेशाध्यक्ष युवा आघाडी आरपीआय पप्पू कागदे, प्रदेश सहसचिव आरपीआय राजाभाऊ ओहाळ, मुंबई प्रदेशाध्यक्ष आर पी आय सचिन (भाई) मोहिते, नियोजन समिती सदस्य सोलापूर धैर्यशील मोहिते-पाटील, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष युवक आघाडी भागीराज परियार तर प्रमुख अतिथी म्हणून अभिजीत पाटील चेअरमन श्री विठ्ठल कारखाना, प्रा.डॉ.बी.पी.रोंगे सचिव, स्वेरी इंजि. कॉलेज, मच्छिंद्र भोसले केंद्रीय सचिव आरपीआय,दिपक पवार सामाजिक कार्यकर्त, कल्याणराव काळे चेअरमन, स. शि. वसंतराव काळे कारखाना, विश्वराज धनंजय महाडिक चेअरमन, भिमा स.सा.कारखाना, अंजलीताई स. आवताडे समाजसेविका,प्रा. सुभाष मस्के भाजपा जिल्हा उपाध्यक्ष,कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. विजय मोरे, सरचिटणीस आरपीआय, प्रा. प्रियदर्शनी पवन महाडिक-कदम,मार्गदर्शक पियुष कुमार सहाय्यक खादी ग्रामोद्योग आयोग, मुंबई, डी.एन.बनसोडे जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी, सोलापूर मंडल,प्रशांत काळे गटविकास अधिकारी, संतोष कोलते जिल्हा उद्योग केंद्र अधिकारी सोलापूर,प्रशांत नाशिककर लीड बँक मॅनेजर, सोलापूर,अजित केंद्रे,सुरेश शिवशरण मा. सहा.सं.खा.ग्रा. आ. मुंबई,कार्यक्रमासाठी मा.प्रा.डॉ.सुभाष कदम, संजय सावंत,अजित (दादा) कंडरे उद्योगपती, मा.डि.के. थोरबोले, दिपक बनसोडे (बिल्डर), मोहन ढवळे सहकार्य लाभले आहे. सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक दिपक चंदनशिवे यांनी केले आहे.
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७*