पंढरी चैत्री एकादशी निमित्त श्री.विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा संपन्न.
24 मराठी न्यूज पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर दि.(02):- चैत्री शुध्द कामदा एकादशी निमित्त मंदीर समितीच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची नित्यपूजा संपन्न झाली. श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी कुटुंबियासमवेत तर रुक्मिणी मातेची नित्यपूजा मंदीर समितीचे सदस्या ॲड. माधवी निगडे यांनी कुटुंबीयांसमवेत केली. चैत्री एकादशी निमित्त मंदीरात विविध फुलांची सजावट करण्यात आली आहे
चैत्री एकादशीला भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी मंदीर समितीच्यावतीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या असून, समितीच्या वतीने दर्शनरांगेत व दर्शन मंडपात, स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालये, लाईव्ह दर्शन आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दर्शनरांग दर्शनमंडप, मंदीर व मंदीर परिसर या ठिकाणची वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत आहे. दर्शनासाठी येणा-या भाविकांसाठी मंदिर समितीच्या वतीने विमा काढण्यात आला आहे
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७*