देव माझा विठू सावळा… कामदा एकादशीनिमित्त सूर्यफुलांनी सजला विठुरायाचा गाभारा.
24 मराठी न्यूज पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर : विठुरायाची पंढरी हरिनामाच्या जयघोषानं दुमदुमून गेली आहे.सुर्यफुलांनी विठुरायाचा गाभारा फुलून गेला आहे.रुक्मिणी मातेचा गाभाराही सूर्यफुलांनी सजवण्यात आलाय चैत्र एकादशी निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संपूर्ण पिवळ्या सुर्यफुलांनी सजले आहे. जवळपास एक लाख पिवळ्या सुर्यफुलांचा वापर मंदिर समितीने या सजावटीसाठी केला आहे.विठ्ठल रुक्मिणी चा देव्हारा, गाभारा चौखांबी, सोळखांबी हा मंदिरातील सर्व परिसर सुर्य फुलांनी सजला होता. फुलांच्या सजावटीने देवाचे रूप अधिकच सुंदर दिसत आहे.
चैत्र शुद्ध एकादशी ही मराठी महिन्यातील पहिली मोठी यात्रा असते.शिखर शिंगणापूर येथे शंभो महादेवाच्या विवाहनिमित्त देव विवाह सोहळ्यास हजर होते आणि लग्नात पुरणपोळीचे भोजन असल्याने आज सर्व वारकऱ्यांचा एकादशीचा उपवास असताना विठुरायला मात्र आज सकाळी पुरणपोळीचा महानैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे
आज दिवसभर रुक्मिणी मातेला उपवासाचा नैवेद्य असतो तर संध्याकाळी देवालाही उपवासाचा नैवेद्य दाखवण्याची शेकडो वर्षाची परंपरा आहे.त्यामुळे आज देवाची लंगडी एकादशी मानली जाते.आज चैत्री एकादशीच्या सोहळ्यासाठी जवळपास चार लाख भाविक पंढरपुरात दाखल झाले देवाच्या दर्शनाची रांग गोपाळपूरपर्यंत पोहोचली आहे.
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७*