म्हसवड येथे तेज न्यूज चे संपादक प्रशांत माळवदे यांचा जेष्ठ पत्रकार विजय टाकणे यांच्या हस्ते सत्कार .
24 मराठी न्यूज पंढरपूर /प्रतिनिधी
म्हसवड येथे प्रशांत माळवदे यांचा जेष्ठ पत्रकार विजय टाकणे यांच्या हस्ते सत्कार म्हसवड प्रतिनिधीमाण तालुक्यातील म्हसवड येथे ज्येष्ठ पत्रकार व तेजस्विता दिवाळी अंक, माण देशी न्यूजचे संपादक संपादक विजय टाकणे यांच्या हस्ते पत्रकार सुरक्षा समिती पंढरपूर विभाग संपर्क प्रमुख,तेज न्यूज चॅनलचे संपादक प्रशांत माळवदे यांचा सहपत्नी शाल,श्रीफळ,तेजस्विता दिवाळी अंक देऊन सत्कार करण्यात आला
यावेळी सामाजिक कार्यकर्ते,युवक क्रांती दल संघटनेचे राज्य सह कार्यवाहक राजकुमार डोंबे उपस्थित होते.यावेळी टाकणे म्हणाले, की आपण करीत असलेल्या सामाजिक,पत्रकारिता आदी कार्याची दखल घेऊन आपणास अनेक पुरस्कार मिळाले आहेत.यापुढील आपल्या कार्यास शुभेच्छा.यावेळी डोंबे म्हणाले आपल्या सोशल मीडिया माध्यमातून अनेक माहिती समजली जाते.त्यामुळे आपल्या बातम्या वाचनीय असतात.यावेळी प्रशांत माळवदे यांनी सर्वांचे आभार मानले आणि यापुढेही असेच कायम सहकार्य करण्याचे सर्वांना आवाहन केले.
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७*