सोलापूर – निराश्रित मूकबधिर ‘ती’ २१ आठवड्यांची गर्भवती! पोलिसांनी मागितली गर्भपातास परवानगी.
24 मराठी न्यू सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील केगाव ब्रिजखाली अशक्तपणा येऊन पडलेल्या महिलेला १०८ रुग्णवाहिकेतून सिव्हिल हॉस्पिटलला आणले. २४ डिसेंबरला तिला डिस्चार्ज मिळाला आणि बेघर निवारा केंद्रात तिला दाखल करण्यात आले.२४ मार्च २०२३ रोजी तिच्या पोटात दुखू लागल्याने तिला पुन्हा सिव्हिल हॉस्पिटलला आणले
त्यावेळी ती निराश्रित मूकबधिर महिला २१ आठवड्यांची गर्भवती असल्याची बाब समोर आली आहे.अशक्त अवस्थेत केगाव ब्रिजखालील ३५ वर्षीय त्या निराश्रित महिलेला २ डिसेंबर २०२२ रोजी १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीतून पुढील उपचारासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ‘ती’ला २४ डिसेंबरला सोलापुरातील बेघर निवारा केंद्रात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी हाताने इशारे करणे, राग येणे असे प्रकार तिच्याकडून सुरु होते. त्यामुळे तिला २० जानेवारी २०२३ रोजी सिव्हिल हॉस्पिटलमधील मानसोपचार तज्ज्ञांकडे आणले गेले. त्यानंतर २० ते २४ फेब्रुवारी २०२३ या काळात अश्विनी रुग्णालय, कुंभारी येथील सर्वरोग निदान शिबिरात दाखविण्यात आले.२४ फेब्रुवारीला तिच्या पोटात खूप दुखत असल्याने तिला पुन्हा सिव्हिल हॉस्पिटलला हलवले. त्यावेळी ती तब्बल १८ महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक बाब समोर आली. २३ मार्च रोजी डिस्चार्ज मिळाल्यावर महिला व बालकल्याण अधिकाऱ्यांशी चर्चा करून तिला सखी वन स्टॉप सेंटरमध्ये ठेवले गेले. २७ मार्चला पुन्हा पोटात दुखत असल्याने तिला सिव्हिल हॉस्पिटलला आणले. सध्या ती २१ आठवड्यांची गर्भवती आहे. ती मूकबधिर व निराश्रित असल्याची संधी साधून कोणीतरी तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याचा गुन्हा सदर बझार पोलिसांत दाखल झाला आहे.पोलिस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड तपास करीत आहेत. तिच्या नातेवाइकांचा पोलिसांनी सात-आठ गावांमध्ये शोध घेतला, पण कोणीच सापडले नाही. दुभाषकाच्या माध्यमातून तिच्याकडून माहिती घेण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला
त्यावेळी घरच्यांनी मारल्याने ती घरातून निघून आल्याची थोडीशी माहिती मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिस अद्याप तिच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत.पोलिसांनी त्या पीडित निराश्रित मूकबधिर महिलेच्या गर्भपातास परवानगी मागितली आहे. ती स्वत: मुलाला सांभाळू शकत नाही, तिचे कोणी नातेवाईक देखील समोर आलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर ही परवानगी मागितली गेली आहे. दरम्यान, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आता या प्रकरणाची सखोल चौकशी करेल. डिसेंबरमध्ये अशक्त अवस्थेत आढळलेली मूकबधिर महिला गर्भवती असल्याची बाब समोर कशी आली नाही, हा प्रश्न आहे. त्यानंतर फेब्रुवारीत माहिती होऊनही त्याचवेळी तसा अर्ज का केला नाही, असाही सवाल आहे. त्याची सखोल चौकशी करून डॉक्टरांच्या अहवालानुसार पुढील कार्यवाही जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा कडून केली जाणार आहे. अशी माहिती सुत्रा करून मिळालेले नुसार
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७*