अभिजीत पाटील गटाला वाढता पाठिंबा…
सहकार शिरोमणी कारखान्याचे सभासदांचा अभिजीत पाटील गटात प्रवेश
24 मराठी न्यूज पंढरपूर तालुका प्रतिनिधी
मुंढेवाडी येथील अभिजीत पाटील यांना सभासदांकडून चांगला प्रतिसाद मुंडेवाढी येथील शरद मोरे, मा.तंटामुक्ती अध्यक्ष शौकत मुजावर आणि मा.चेअरमन तुकाराम मोरे यांचा अभिजीत पाटील गटात प्रवेश
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंढरपूरच्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगत होताना दिसत आहे. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील व कल्याणराव काळे यांच्यात चांगलीच खंडाजंगी होताना दिसत आहेत. अभिजीत पाटील यांनी बंद पडलेले कारखाने आणि विठ्ठल कारखाना यशस्वी चालविल्यामुळे सभासदांचा चांगलाच कौल त्यांच्याच बाजूने दिसत आहे. गावोगावी सभासदांच्या भेटीगाठी साठी अभिजीत पाटील हे मुंडेवाडी येथील उत्स्फूर्त प्रतिसाद अभिजीत पाटील गटाला मिळत असल्याने मुंढेवाडी येथील युवक नेते श्री.शरद मोरे आणि माजीतंटामुक्ती अध्यक्ष श्री.शौकतभाई मुजावर, मा.चेअरमन विकास मा.चेअरमन तुकाराम आण्णा मोरे यांनी अभिजीत पाटील गटात जाहीर प्रवेश केला असून विधानसभेसाठी अभिजीत पाटील यांची विधानसभेची साखर पेरणी सुरू असल्याचे सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना सभासद गटांमध्ये प्रवेश करत अभिजीत पाटील यांच्या कार्यावर विश्वास ठेवून प्रवेश करत आहेत…यावेळी विठ्ठल कारखान्याचे संचालक अशोक घाडगे, माजी उपसरपंच सिद्धेश्वर घाडगे, संचालक दिनकर दाजी चव्हाण,रविंद्र मोरे ,मुरलीधर दाजी नवले,शरद मोरे,शौकत मुजावर,तुकाराम मोरे,जावेद मुजावर,माजी सरपंच श्रीरंग नवले,नागनाथ मोरे ,रायप्पा हळवणकर इत्यादी उपस्थित होते.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com