सोलापूर – जिल्ह्यातील आशा सेविकांचा पाच महिन्यांपासून पगार नाही
24 मराठी न्यूज नेटवर्क
सोलापूर, 27 मे, (हिं.स.) शासनाच्या आरोग्यदायी योजना शहरी भागासह ग्रामीण भागातील वाड्यावस्त्यांपर्यंत पोच करण्यासाठी ऊन, वारा, पाऊस याची कसलीही तमा न बाळगता वर्षभर प्रयत्न करत असलेल्या आशासेविकांना उपासमारीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे गेल्या पाच महिन्यांपासून आशासेविकांचे मानधन मिळालेले नसल्याने, सोलापूर जिल्ह्यातील आशासेविका कमालीच्या संतापल्या असुन, तातडीने थकीत मोबदला जमा करा.अन्यथा गट प्रवर्तिकांसह आशासेविका ‘एक जुन पासून बेमुदत काम बंद आंदोलन’ करणार असल्याचे निवेदन उपळाई बुद्रूक (ता.माढा) येथील वैद्यकीय अधिकारी डॉ धनराज कदम यांना दिले आहे. सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण अभियान अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर २७०० आशासेविका व १३६ गट प्रवर्तिका काम करत आहेत.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com