रमाबाई आंबेडकर बाबासाहेबांएवढ्याच विद्वान व त्यागी होत्या – डी. के. साखरे
24 मराठी न्यूज, सोलापूर जिल्हा प्रतिनिधी प्रकाश इंगोले,,,,,,
डोंगरगाव ता. मंगळवेढा -: मातोश्री रमाबाई भिमराव आंबेडकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एवढ्याच विद्वान व त्यागी होत्या म्हणून तर भिमराव आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर झाले असे प्रतिपादन डोंगरगाव शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डी. के. साखरे यांनी केले.शनिवार दिनांक 27 मे 2023 रोजी ग्रामपंचायत डोंगरगाव, रमाई फाउंडेशन व भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चा यांच्या वतीने रमाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात साखरे बोलत होते.
प्रारंभी डोंगरगाव ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सारिका विवेक खिलारे यांच्या हस्ते माता रमाई च्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मुंबई उच्च न्यायालयाचे ऍडव्होकेट सुनील जगधने यांनी त्रिसरण पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी डी.बी.एस. बँकेचे व्हॉइस प्रेसिडेंट तुळशीदास करांडे, ऍडव्होकेट सुनील जगधने , पत्रकार सुनील कसबे, भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष विवेक खिलारे यांची ही त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी भाषणे झाली.तर हाजापूर शाळेचे माजी मुख्याध्यापक ईश्वर मस्के गुरुजी यांनी आपल्या हृदयस्पर्शी भाषणातून उपस्थितांना भावनावश केले.
याचवेळी मार्च 2023 च्या परीक्षेमध्ये इयत्ता 12वी उत्तीर्ण झालेल्या डोंगरगावातील अस्मिता आण्णासो पाटील, श्वेता भागवत पाटील, चेतन मदन पाटील, समर्थ लक्ष्मण हेंबाडे, माधुरी संजय चंदनशिवे,गौरी सुभाष नागणे, संध्या धोंडाप्पा साखरे या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तुळशीदास करांडे यांनी विद्यार्थ्यांना करिअर घडविण्याचे अनेक मार्ग व सोयी सवलती असल्याचे सांगून ही यशाची परंपरा अखंडित राहो अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी आण्णासाहेब पाटील, भागवत पाटील, शरद हेंबाडे,दादा खिलारे, अमोल मेटकरी, शब्बीर सय्यद,सिदू झेंडे, रमाई फौंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा श्रीदेवी साखरे, वैशाली चंदनशिवे,उर्मिला माने यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶*आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com*