महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी ‘आम ‘ची स्वराज्य यात्रा : शर्मा मेनन
विठुरायाचे दर्शन घेवून आपच्या कार्यकर्त्यांनी पंढरीतून स्वराज्य यात्रेस सुरुवात केली
24 मराठी न्यूज नेटवर्क
राज्यात ही जी पन्नास खोक्यांची सरकार तग धरून बसलेली आहे, ती लोकशाही साठी अत्यंत अपायकारक आहे. आज कांद्याला योग्य भाव मिळत नाही, कापूस विकला जात नाही परंतु ह्या सरकारला दयामाया उरली नसून हे सरकार निष्टुर झाली आहे, अशी टीका राष्ट्रीय कार्यकारणी सदस्या प्रीती शर्मा मेनन यांनी स्वराज्य यात्रा दरम्यान माध्यम प्रतिनिधी सोबत संवाद साधताना केली. आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय नेत्यांच्या तसेच प्रभारी दिपक सिंघला तसेच सह-प्रभारी गोपाल इटालिया ह्यांच्या निर्णयानुसार आम्ही संपूर्ण महाराष्ट्राभर “स्वराज्य यात्रा काढणार आहोत. स्वराज्य यात्रेची सुरुवात पंढरपूर येथून झाली •असून ती रायगड पर्यंत सुरू राहणार आहे. आज पंढरपूर येथे विठुरायाचे दर्शन घेऊन महाराष्ट्रातील आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून स्वराज्य यात्रेची सुरुवात करण्यात आली. स्वराज्य यात्रे दरम्यान माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना प्रीती शर्मा मेनन म्हणाल्या की, खोके सरकार खूप मोठमोठ्या घोषणा करतात पण जमिनीवर काम काही होत नाही. आज कांद्याला योग्य भाव मिळत नाही, कापूस विकला जात नाही परंतु ह्या सरकारला महाराष्ट्रातल्या जनतेची काहीच दयामाया नाही. आज आम्ही विठ्ठलाचरणी हीच प्रार्थना करायला आलो आहोत की, ह्या सरकारला सुबुद्धी मिळो आणि महाराष्ट्रातील जनतेला ही बळ मिळो जेणेकरून ह्या जुलमी सरकारला सत्तेबाहेर जनता काढतील आणि एका खऱ्या अर्थाने आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य इथे स्थापन होईल.पुढे बोलतांना प्रीती शर्मा मेनन म्हणाल्या की, ह्या यात्रेमागचा मूळ उद्देश हा लोकांना जोडण्याचा आहे आणि लोकांना पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाची उजळणी करून देणे, हा आहे. कारण जनता आज ह्या पन्नास खोक्यांच्या सरकारपुढे हताश झालेली आहे. जनतेला त्यांचे स्वातंत्र्य परत मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या मताचे मोल काय आहे ह्याची त्यांना जाणीव करन्न देण्यासाठी आम्ही ही यात्रा काढत आहोत. आमचे महाराष्ट्राचे सर्व नेते, सह-प्रभारी गोपाळ इटालिया ह्यांच्या मार्गर्शनाखाली इथून रायगड पर्यंत जाऊन लोकांना जागृत करणार आहेत, असे मत प्रीती शर्मा मेनन यांनी व्यक्त केले. लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे कार्यकत्यांनी सुरुवात केली.आम आदमी पार्टी महाराष्ट्रात आगामी सर्व निवडणूका लढणार आहे. भाजपचा दुटप्पीपणा समोर आणत, भाजप सत्तेसाठी काहीही करू शकते. त्यामुळे लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी सगळ्यांनी भाजप विरुद्ध एकवटले पाहिजे, ह्यात काहीच दुमत नाही असेही प्रीती शर्मा मेनन यांनी सांगितले.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com