शासन आपल्या दारी अंतर्गत मोहोळ तालुक्यात साडेचार हजार जणांना लाभ.
24 मराठी न्यूज पंढरपूर श्री नंदकुमार देशपांडे
शासन आपल्या दारी व महाराजस्व अभियानांतर्गत तहसील कार्यालय, मोहोळच्या वतीने आयोजित महाशिबिरात जवळपास 4 हजार 537 लाभार्थीना वेगवेगळे लाभ देण्यात आले. तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी ही माहिती दिली. तहसीलदार प्रशांत बेडसे म्हणाले, जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे आणि उपविभागीय अधिकारी गजानन गुरव यांच्या मार्गदर्शन खाली दि. २२ ते २९ मे या कालावधीत महसूल मंडळ स्तरावर महाशिबिरांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये महसूलसह कृषि, गट विकास अधिकारी, पशुसंवर्धन, उद्योग, आरोग्य, कामगार, महिला व बालविकास अशा अनेक विभागांनी सक्रिय सहभाग घेतला. या महाशिबिरास आमदार यशवंत माने यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यांच्या हस्ते लाभार्थींना दाखले, प्रमाणपत्र, लाभ वाटप करण्यात आले या महाशिबिरात दिलेला लाभ दिलेली संख्या पुढीलप्रमाणे –पाणंद रस्ते खुले करणे – 20जातीचे दाखले – 460रहिवासी दाखले – 662उत्पन्न दाखले – 2280नॉन क्रिमी लेयर दाखले -153 प्रधानमंत्री किसान सन्मान – 181संजय गांधी योजना – 164इतर विभाग – 637 मोहोळ तालुक्यात साडेचार हजार जणांना लाभ
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com