पत्रकार लखन साळुंखे यांचे प्रसंगावधान तर पोलिसांचे तत्पर कार्य हरवलेली नात सुखरूप आजीच्या स्वाधीन
24 मराठी न्यूज पंढरपूर श्री नंदकुमार देशपांडे
पंढरपूर : आषाढी यात्रे करता आजीबरोबर आलेली दहा वर्षाची नात प्रदक्षिणा मार्गावर जाताना उद्धव घाट या ठिकाणी दोघींची चुकामुक झाली आणि दहा वर्षाची चिमुकली बावरलेल्या स्थितीत या ठिकाणाहून जाणारे 24 मराठी वृत्त वाहिनीचे संपादक लखन साळुंखे यांच्या नजरेस पडली त्यांनी या दहा वर्षाच्या चमकलेला जवळ बोलावून धीर देऊन कुठून आले कुठे जाणार आहेस कुठे उतरलीस अशी चौकशी केली असता या मुलीने राजवी जनार्दन पळसकर राहणार पळशी गाव जिल्हा औरंगाबाद असे सांगितले यानंतर साळुंखे यांनी या परिसरात यात्रे करता बंदोबस्त असलेले पुणे येथील पोलीस उपनिरीक्षक विनोद हरिदास शिंदे ग्रामीण यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या मदतीने त्या मुलीची नातेवाईक लिलाबाई जगन्नाथ पळसकर यांच्याशी संपर्क केला ध्वनी क्षेपणावरून या मुलीच्या आजीचे नाव गाव पुकारले असता त्या गर्दीत हरवलेल्या आजी लिलाबाई पळसकर यांचा समजताच लखन साळुंखे व विनोद शिंदे उपनिरीक्षक यांनी या दहा वर्षाच्या मुलीला आजीच्या हवाली केले साळुंखे यांची तत्परता पोलीस प्रशासनाचे प्रयत्न सतर्कता यामुळे गर्दीत हरवलेली मुलगी आजी पर्यंत पोहोचण्यास मदत झाली
यात्रा कालावधीमध्ये असे प्रसंग बऱ्याच वेळा घडलेली आहेत परंतु येणारे कोणीतरी अज्ञात व्यक्ती उभी आहे असे समजून विचारपूस न करता पुढे निघून जातात त्यामुळे त्या वाट चुकलेल्या व हरवलेल्या व्यक्तीमध्ये गोंधळ उडतो नातेवाईक स्वयंभैर होतात अशावेळी सतर्कता जागरूकता दाखवली तर चुकलेली व्यक्ती आपल्या नातेवाईकाजवळ पोलिसांच्या मदतीने सुखरूपपणे जाऊ शकते हे या घटनेवरून दिसून येते
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com