अवैधरित्या वाहनामध्ये घरगुती गॅसचा भरणावर मोठी कारवाई इलेक्ट्रीक मोटार व वजनकाटा या मुद्देमालासह रंगेहात पकण्यात आले.
24 मराठी न्यूज पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर शहर हे तिर्थक्षेत्र असल्याने शहर परीसरामध्ये मोठया प्रमाणात गर्दी असते. पंढरपूर शहर परीसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. सदर गर्दीमध्ये घरगुती सिलेंडरचा अवैधरीत्या वापर केल्यास मानवी जिवित हाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदरची बाब लक्षात घेवुन आज गजनन गुरव, उपविभागीय अधिकारी पंढरपूर विभाग, पंढरपूर व मा. श्री. सुशील बेल्हेकर तहसिलदार पंढरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहरात अवैधरित्या वाहनामध्ये घरगुती गॅसचा भरना होत असलेल्या ठिकाणी कार्यवाही करण्यात आली. पुरवठा निरिक्षक सदानंद नाईक यांनी शहर परीसरात विविध ठिकाणी तपासणी अंतर्गत पंढरपूर येथील मटन मार्केट समोर संत पेठ, पंढरपूर, बाजीगर ज्यूस सेंटर मागे गजानन महाराज पार्किंग, इंदीरा गांधी चौक नगर परीषद कॉम्प्लेक्स मागे तसेच कळशेनगर वडर गल्ली जुना अकलुज रोड लगत अवैधरित्या घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर मधुन रिक्षामध्ये भरत असल्याची माहीती मिळाल्याने तहसिल कार्यालयातील महसूल सहाय्यक आर. आर. शिंदे मुलकी शिपाई श्री. भाऊसाहेब शिंदे श्रीमती अनिता जाधव सदर ठिकाणी गेले असता सदर ठिकाणी घरगुती वापरातील सिलेंडर मधुन रिक्षामध्ये भरत असल्याची माहीती मिळाल्याने तहसिल कार्यालयातील महसूल सहाय्यक आर. आर. शिंदे मुलकी शिपाई श्री. भाऊसाहेब शिंदे श्रीमती अनिता जाधव सदर ठिकाणी गेले असता सदर ठिकाणी घरगुती वापरातील सिलेंडर व टाक्यातील गॅस काढून वाहनांमध्ये भरण्यासाठी लागणारे इलेक्ट्रीक मोटार व वजनकाटा या मुद्देमालासह रंगेहात पकण्यात आले.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com