भारतीय जनता पार्टीच्या संयुक्त मोर्चा संमेलन व सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मीट कार्यक्रम संपन्न
24 मराठी न्यूज राजेश शिंदे / मोहोळ .
भारतीय जनता पार्टी मोहोळ विधानसभा .मतदारसंघाच्या वतीने मोदी @9 महाजनसंपर्क अभियान अंतर्गत शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता संयुक्त मोर्चा संमेलन व सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मीट असे दोन कार्यक्रम हॉटेल धुलवड हॉल, मोहोळ येथे किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारणी सदस्य श्री. शंकरराव वाघमारे , लोकसेवक श्री संजय क्षीरसागर, मोहोळ विधानसभा निवडणूक प्रमुख तथा तालुकाध्यक्ष श्री.सुनील चव्हाण व सोशल मीडिया मीट जिल्हाप्रमुख तथा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस श्री. विकास वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोहोळ विधानसभा अभियान संयोजक तथा शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक श्री.सुशील क्षीरसागर , संयुक्त मोर्चा संमेलन अभियान प्रमुख तथा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष श्री. गणेश झाडे, व सोशल मीडिया मीट अभियान प्रमुख तथा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस श्री गुरुराज तागडे यांच्या नियोजनाने ठरवलेला कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य श्री शंकरराव वाघमारे यांनी संमेलनाला संबोधित करत असताना माननीय देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नववर्षाच्या केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. आणि गेल्या 30 मे ते 30 जून या कालावधीमध्ये अभियानाचं जे काम चालू आहे त्याबद्दल संयोजक व त्यांच्या सर्व टीमने केलेल्या यशस्वीरित्या पार पाडलेल्या सर्व अभियानाचे कौतुक करून अभिनंदन केले. तसेच या कार्यक्रमात तालुकाध्यक्ष श्री. सुनील चव्हाण, संयोजक श्री. सुशील क्षीरसागर, श्री. विकास वाघमारे, श्री.नागेश मेजर क्षीरसागर, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष फ़ंटू गोफने, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष श्री. गणेश झाडे यांनीही मार्गदर्शन केले. त्याच सोबत प्रस्तावना सोशल मीडिया विधानसभा अभियान प्रमुख श्री. गुरुनाथ तागडे आणि सूत्रसंचालन तालुका सरचिटणीस श्री विष्णू चव्हाण यांनी केले . या कार्यक्रमात किसान मोर्चा तालुका उपाध्यक्षपदी आष्टे गावचे श्री महेश गावडे तसेच मोहोळ तालुका उपाध्यक्षपदी श्री विनोद काका देशपांडे यांची नूतन निवडीचे पत्र देऊन सत्कार केला. यावेळी ता. सरचिटणीस क्रमशः श्री.सतीश पाटील, श्री.मुजीब मुजावर, श्री.महेश सोवनी, ता. सचिव श्री. विशाल पवार अनु. जाती मोर्चा तालुकाध्यक्ष श्री.दीपक गवळी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्री. रणजीत चवरे, प्रज्ञावंत जिल्हा उपाध्यक्ष श्री.अविनाश पांढरे, तालुका उपाध्यक्ष श्री.माऊली भगरे, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस श्री.सागर वाघमारे, श्री. महादेव पाटील, पै. भारत आवारे, श्री. दिनेश गडदे, श्री.नवनाथ गाढवे, शहर सरचिटणीस श्री. विशाल डोंगरे, तालुका उपाध्यक्ष श्री.सागर लेंगरे, युवा मोर्चा उपाध्यक्ष श्री.द्रोणाचार्य लेंगरे, श्री. पप्पू लांडगे, श्री.संतोष नामदे, भटक्या विमुक्त मोर्चा तालुकाध्यक्ष श्री. औदुंबर वाघमोडे, पंढरपूरचे श्री. बालाजी वाघमारे , श्री. लक्ष्मण शिंदे आदीसह तालुका पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com