लायन्स क्लब पंढरपूरच्या अध्यक्षपदी ला.आरती बसवंती.
24 मराठी न्यूज नेटवर्क
लायन्स क्लब पंढरपूरच्या २०२३-२०२४ या वर्षीच्या पदाधिकाऱ्याची निवड नुकतीच जाहीर झाली.त्यामध्ये क्लब अध्यक्ष ला.आरती ओंकार बसवंती यांची बहुमताने निवड करण्यात आली.ला.आरती बसवंती या गेली २५ वर्षे लायनिझम मधे कार्यरत आहेत.त्यांनी या कालावधीत अनेक समाजोपयोगी कार्ये करून समाजमनात आपला ठसा उमटवला आहे.त्या समाजकारणाबरोबरच राजकारणात देखील सक्रिय आहेत.त्यांनी राजकारणात विविध ठिकाणी अनेक पदे।भूषवली आहेत व त्यांना योग्य तो न्याय दिला आहे.सध्या त्या शिवसेना या पक्षामध्ये सोलापूर जिल्हा माढा विभागाच्या महिला आघाडी प्रमुख आहेत यात माळशिरस,करमाळा,माढा आणि सांगोला या तालुक्यांचा समावेश होतो.
या माध्यमातून त्यांना बरीच विधायक कामे करण्याचा त्यांचा मानस त्यांनी बोलून दाखवला.लायन्स क्लब पंढरपूरच्या अध्यक्ष असताना त्यांना क्लबची सर्वार्थाने खूप प्रगती करण्याची त्यांची जिद्दही त्यांनी बोलून दाखवली. त्यांच्या समवेत त्यांच्या सचिवा म्हणून ला.डॉ.अश्विनी परदेशी व खजिनदार ला.शोभा गुप्ता ,प्रथम उपाध्यक्ष ला.सीमा गुप्ता,द्वितीय उपाध्यक्ष ला.डॉ.सुरेखा बोरावके यांची निवड झाली आहे या सर्वांना ला.रा.पा.कटेकर,ला.ऍड.भारत वाघुले,ला.कैलास करंडे,ला.राजेंद्र शिंदे,ला.मुन्नागिर गोसावी,ला.डॉ.अजित गुंडेवार, ला.डॉ.विवेक गुंडेवार ला.विवेक परदेशी,ला.ओंकार बसवंती या सर्वांचे मार्गदर्शन लाभणार आहे.या सर्व निवडीबद्दल सर्वांचे समाजातून कौतुक होत आहे.विविध मान्यवरांनी सर्वांना व क्लबला शुभेच्छा दिल्या.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com