कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त “कृषी दिन” म्हणून मोहोळ येथे कार्यालयात कृषी दिन साजरा.
24 मराठी न्यूज राजेश शिंदे / मोहोळ .
मोहोळ : – महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ आणि तालुका कृषी अधिकारी, मोहोळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ०१ जुलै, २०२३ हा कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त “कृषी दिन” म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून कृषि विज्ञान केंद्र, मोहोळचे कार्यक्रम समन्वयक डॉ. तानाजी वळकुंडे, सोलापूरचे उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाचे तंत्रज्ञान अधिकारी श्री. भारत कटके तसेच मोहोळचे तालुका कृषी अधिकारी श्री. अतुल पवार, मोहोळच्या पंचायत समितीचे कृषि अधिकारी श्री. कल्याण श्रावस्ती हे उपस्थित होते. श्री कल्याण श्रावस्ती यांनी कै. वसंतराव नाईक यांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या घटनांची माहिती दिली. तांत्रिक सत्रामध्ये मोहोळ च्या कृषि विज्ञान केंद्राचे मृद विज्ञान विषयाच्या विशेषज्ञा श्रीमती काजल मात्रे यांनी हवामान आधारित शेती पद्धती तसेच CRA तंत्रज्ञान नुसार फळबाग लागवड यावर मार्गदर्शन केले
त्याचबरोबर कृषी संजीवनी सप्ताह याची सांगता व आढावा याबद्दल अतुल पवार यांनी मार्गदर्शन केले मोहोळ च्या कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. तानाजी वळकुंडे यांनी प्रस्तावना केली. मोहोळ च्या कृषि विज्ञान केंद्राचे अन्न शास्त्र व तंत्रज्ञान विषयाचे विशेषज्ञ प्रा. दिनेश क्षिरसागर यांनी पौष्टिक तृणधान्य आहारातील महत्व व प्रक्रिया उद्योग याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती गायत्री चव्हाण यांनी केले तसेच आभार प्रदर्शन डॉ. पंकज मडावी यांनी केले.यावेळी कृषि विज्ञान केंद्रातील सर्व शास्त्रज्ञ, कृषि विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com