गरीबाच्या विठ्ठलास भाविकाकडून भरभरून दान यात्रेत ६ कोटी २७ लाख रुपये उत्पन्न मिळाले
24 मराठी न्यूज नेटवर्क
पंढरपूर : आषाढी यात्रा कालावधीत विठ्ठलाच्या दर्शनासाठी १५ लाखाहून अधिक भाविक दाखल झाले. यात्रा कालावधीत भाविकांनी भरभरून दान दिले. यातून मंदिर समितीला ६ कोटी २७ लाखाचे उत्पन्न मिळाले असल्याची माहिती विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.आषाढी यात्रा कालावधीत १९ जून ते ३ जुलै कालावधीत १५ लाखाहून अधिक भाविकांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. भाविकांनी विठ्ठलाचे दर्शन घेऊन चरणावर दक्षिणा टाकली. यातून ४५ लाख २३ हजार रूपये जमा झाले. रूक्मिणी माता चरणावर १२ लाख ६९ हजार, देणगी २ कोटी १३ लाख, प्रसाद बुंदी व राजगिरा लाडू ७५ लाख, फोटो विक्री १ लाख ४२ हजार, विठ्ठल भक्त निवास भाडे १९ लाख, मोबाईल लॉकर १ लाख ४० हजार, सांडी विक्री १ लाख १२ हजार, परिवार देवता ५३ लाख, हुंडी पेटी १ कोटी ३८ लाख, सोने-चांदी दागिने ३० लाख रूपये असे एकूण ६ कोटी २७ लाख उत्पन्न मिळाले.गेल्या वर्षी मंदिर समितीला ५ कोटी ६९ लाख उत्पन्न मिळाले होते. यंदा उत्पन्नात ५७ लाख रूपयाची वाढ झाली आहे.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com—————————————————, LIKE, SHARE, SUBSCRIBETHIS YOUTUBE CHANNEL—————————————-———–