राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई हातभट्टी दारू ठिकाणांवर छापे
एकूण दोन लाख 51 हजार आठशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
24 मराठी न्यूज सोलापूर जिल्हा प्रतिनिधी श्री प्रकाश इंगोले
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अ, ब, भरारी पथक व सीमा तपासणी नाक्याच्या पथकांनी शनिवारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील घोडा तांडा या ठिकाणी सामूहिक मोहीम राबवून शोभु भोजू जाधव वय 57 वर्षे, जनाबाई रामू पवार वय 44 वर्षे, मथुराबाई भिमा चव्हाण वय 54 वर्षे भारत वालू राठोड वय 33 वर्षे यांच्या सुरू असलेल्या हातभट्टी ठिकाणांवर छापे टाकून गुळमिश्रित रसायन व हातभट्टी दारू जप्त केली. तसेच भोजप्पा तांडा येथील बेबाबाई पांडुरंग चव्हाण वय 52 वर्षे, सुमन गुरुनाथ राठोड वय 47 वर्षे व अश्विनी थावरू राठोड वय 22 वर्षे यांच्या ताब्यातूनही गुळमिश्रित रसायन व हातभट्टी दारू जप्त केली. या मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने सात गुन्हे दाखल केले असून दहा हजार सहाशे लिटर रसायन व 170 लिटर हातभट्टी दारू असा एकूण दोन लाख 51 हजार आठशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच सर्व सातही आरोपीं विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी उप अधीक्षक सदानंद मस्करे, निरीक्षक राहुल बांगर, दुय्यम निरीक्षक उषाकिरण मिसाळ, सुरेशझगडे, अक्षय भरते, रोहिणी गुरव, मानसी वाघ, कृष्णा सुळे, सचिनगुठे, सहायक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, गजानन होळकर,जवान शोएब बेगमपुरे, किरण खंदारे, चेतन व्हनगुंटी, अशोक माळी,अण्णा कर्चे, अनिल पांढरे, इस्माईल गोडीकट, प्रशांत इंगोले, वसंतराठोड, योगीराज तोग्गी, वाहनचालक रशिद शेख यांच्या पथकाने पारपाडली.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com—————————————————, LIKE, SHARE, SUBSCRIBETHIS YOUTUBE CHANNEL—————————————————