यशोदा महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या. मंगळवेढा या अर्थदालनाच्या ५ व्या वर्धापन संपन्न.
५व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित स्नेहसोहळा कार्यक्रमाप्रसंगी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे युवक नेते मा.श्री.सोमनाथ जी आवताडे यांनी उपस्थित राहून कर्तव्यदक्ष चेअरमन मा.सौ.निलाताई आटकळे मॅडम* यांचा श्री.विठ्ठल-श्री संत दामाजी पंत यांची सुबक मूर्ती देऊन सत्कार करत पुढील कार्य वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.ग्राहकाभिमुख पारदर्शक कारभाराची वैभवशाली व्यापकता अधोरेखित करुन सामान्य जनतेची अर्थिक सुबत्ता साधणाऱ्या यशोदा पतसंस्थेचे तालुक्याच्या सहकार व अर्थकारणामध्ये आश्वासक स्थान आहे. अचूक कार्यपद्धतीच्या जोरावर ग्राहकांची विश्वासाहर्ता जतन करणारे हे दालन जिल्ह्याच्या बँकिंग क्षितिजावर विधायक सेवेची मोहोर प्रस्थापित करेल अशा शुभेच्छा मा.सभापती महोदय यांनी दिल्या.यावेळी माजी प्राचार्य मा.प्रा.येताळा भगत सर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्री.प्रदीप जी खांडेकर, भाजपा विधानसभा अध्यक्ष श्री.राजेंद्र बापू सुरवसे, माजी मि.संचालक श्री. भारत जी निकम सो, व्यवस्थापिका मा.सौ.वैशालीताई गणेशकर मॅडम, आदर्श पिग्मी संकलक श्री.अतुल जी मुरडे सो, स्वीय सहाय्यक श्री.फटे सो आदी मान्यवर उपस्थित होते
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com—————————————————, LIKE, SHARE, SUBSCRIBETHIS YOUTUBE CHANNEL—————————————————