पंढरपूर शहरातील रोटरी भवन येथे इनरव्हील क्लब ऑफ पंढरपूर पल्स चा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न.
रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी ॲड.नम्रता खंकाळ यांची निवड
24 मराठी न्यूज पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर शहरातील रोटरी भवन येथे इनरव्हील क्लब ऑफ पंढरपूर पल्स चा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी अध्यक्षपदी अॅड.नम्रता खंकाळ, सेक्रेटरी पदी वर्षा बडवे, व्हॉईस प्रेसिडेंट पदी रचना सेहगल, खजिनदार पदी पल्लवी उपाध्ये, आयएसओ पदी पल्लवी गोरे, संपादक पदी श्वेता पाटील यांची निवड करण्यात आली. यावेळी नूतन अध्यक्षा अॅड. नम्रता खंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली एक्झिक्युटिव्ह टीम मध्ये स्वाती भगरे, प्रांजली दोशी, गौरी गोसावी, मुग्धा शहा,विद्या रेपाळ यांनी पदभार स्वीकारला. याप्रसंगी अंध विद्यार्थी अतुल देशमुख यांना शिक्षणासाठी लॅपटॉप भेट देण्यात आला. संपादक श्वेता पाटील यांनी बनविलेल्या अंतर्नाद या बुलेटीनचा प्रकाशन सोहळा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या वेळी माझी अध्यक्षा सारिका कटकमवार, सेक्रेटरी पल्लवी मनमाडकर, सामाजिक कार्यकर्त्या सुनीता वैद्य, शर्वरी मुळे यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास रोटरी क्लब, लायनेस क्लब, इनरव्हील क्लब, ग्राहक पंचायत, विविध सामाजिक संस्था, केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com—————————————————, LIKE, SHARE, SUBSCRIBETHIS YOUTUBE CHANNEL—————————————————