आण्णाभाऊंचे साहित्य विस्थापितांना प्रेरणा देणारे – प्रा.डी. के. साखरे
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी प्रकाश इंगोले,
सोलापूर -: “जग बदल घालुनी घाव ; गेले सांगून मज भिमराव” असे म्हणणाऱ्या आण्णाभाऊ साठे यांचे साहित्य विस्थापितांना प्रेरणा देणारे व त्यांच्या मध्ये विरश्री निर्माण करणारे आहे असे प्रतिपादन दलित अत्याचार विरोधी कृती समितीचे प्रदेश अध्यक्ष प्रा.डी. के. साखरे यांनी केले आण्णाभाऊ साठे यांच्या 103 ऱ्या जयंती निमित्त सोलापूर येथे आयोजित केलेल्या आदरांजली कार्यक्रमात साखरे बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की दीड दिवस शाळेत गेलेल्या आण्णाभाऊंना लहानपणी जातीयतेचे व दारिद्र्यचे चटके बसले त्यातूनच त्यांनी दलित शोषित पीडित कष्टकरी व कामगारांच्या करीता लढे उभारले छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रशिया मध्ये जाऊन गायणारे व ‘आपली फकिरा ‘ नावाची कादंबरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीला अर्पण करणारे ते परिवर्तन वादी साहित्यिक होते. आण्णाभाऊंची जयंती केवळ मनोरंजनासाठी साजरी न करता प्रबोधनाच्या मार्गाने व विधायक कामाच्या माध्यमातून साजरी झाली पाहिजे. यावेळी महिला आघाडीच्या नेत्या वैशाली सावंत,श्रीदेवी साखरे,मरिआईवाले समाजाचे वस्ताद चणाप्पा मरीआईवाले, रामचंद्र बनसोडे,आनंद मोरे व महमद मणेरी यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com*