लोटस इंग्लिश स्कूल मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती संपन्न
पंढरपूर प्रतिनिधी श्री संपत लवटे
श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित लोटस इंग्लिश स्कूलमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे १०३ वी.जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी संपन्न झाली यावेळी स्कूलच्या प्राचार्या.डॉ.जयश्री भोसले यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्राचार्या बोलताना म्हणाले की अण्णाभाऊ साठे हे एक लेखक, लोकशाहीर,तसेच समाजसुधारक, म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक लोकनाट्य प्रवास वर्णन, कथा,कादंबरी,नाटक,शाहीर,पोवाडे, पटकथा,यांचे देखील लेखन केले. आपणास दिसून येते.संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत कॉम्रेड अमर शेख आणि लालबावटा कलापथकाद्वारे त्यांनी प्रबोधनाची काम केले.संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.पोवाडा आणि लावणी यासारख्या लोककथात्मक,कथा शैलीचे,वापराने लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले व त्यांचे कार्य अनेक समुदायापर्यंत पोहोचण्यास मदत झाली. तसेच लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून तिच्या कार्याची देखील माहिती दिली.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी रोंगे,अध्यक्ष.एच.एम बागल,उपाध्यक्ष बी.डी.रोंगे, खजिनदार दादासाहेब रोंगे यांनी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमा वेळी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विभागप्रमुख तसेच महिला शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होते.
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com*