पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये प्रशालेतील सर्व कमिटी मेंबर्स ची एकत्रित सभा व स्वागत समारंभ. संपन्न.
पंढरपूर तालुका प्रतिनिधी
पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आज दिनांक 5 ऑगस्ट 2023 रोजी प्रशालेमध्ये शासन नियमा प्रमाणे स्कूल मॅनेजमेंट कमिटी सदस्य तसेच पेरेंट्स टीचर असोसिएशन सदस्य तसेच माता पालक संघ सदस्य तसेच ट्रान्सपोर्ट कमिटी सदस्य या सर्व कमिटी सदस्यांची पालक सभा घेण्यात आली
याप्रसंगी या कमिटी सदस्यांच्या समोर प्रशालेचे कौतुक राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये राज्यात 6थ क्रमांक प्राप्त विद्यार्थी वेदांत नागेश पवार याचा सत्कार प्रशालीच्यावतीने करण्यात आला तसेच सर्व कमिटी सदस्यांचेही स्वागत प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. सुनीता मोहोळकर यांनी केले तसेच सर्व संघटनेच्या जबाबदाऱ्या व प्रशाले कडून असणाऱ्या अपेक्षा तसेच प्रशालेत मागील वर्षापासून केलेल्या सुधारणा झालेला खर्च याचे विवेचन तसेच सर्व कमिटी मेंबरने वेळोवेळी मिटींगला उपस्थित राहून प्रशालेला केलेले सहकार्य याबद्दल ऋण व्यक्त केले
तसेच पालकांचे प्रॉब्लेम्स यावरही चर्चा करण्यात आली तसेच विद्यार्थी विकासासाठी काय उपाययोजना करण्यात येईल हे ठरवण्यात आले सर्व कमिटीचे जवळजवळ 50 ते 55 सदस्य आज मीटिंगसाठी उपस्थित होते