नगर वाचन मंदिर, पंढरपूर. येथे ध्वजारोहण समारंभ संपन्न
पंढरपूर तालुका प्रतिनिधी
नगर वाचन मंदिर, पंढरपूर. येथे मंगळवार दिनांक 15/8/ 2023 रोजी अमृत महोत्सव निमित्त संस्थेच्या सदस्या व इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ. अनुराधा जयंत हरिदास यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या इनरव्हील क्लबच्या प्रीती वाघ व अमृता आराध्ये उपस्थित होत्या. तसेच संस्थेचे सचिव श्री दत्तात्रय वाईकर संस्थेचे सदस्य श्री पा. म. अल्लापुरकर तसेच ग्राहक पंचायतीचे श्री अण्णा ऐतवाडकर पत्रकार लखन साळुंखे उपस्थित होते. यावेळी राष्ट्रध्वजाला सलामी देऊन सर्वांनी राष्ट्रगीत गायले. तसेच श्री अल्लापुरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कर्मचारी श्री प्रवीण पाठक, विश्वनाथ मिसाळ, राजकुमार अवताडे, आकाश अन्नदाते उपस्थित होते.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com