राष्ट्रीय लोकअदालतीत 230 प्रकरणे निकाली 7 कोटी 21 लाख रुपयांची वसुली झाली
पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर दि. (10):- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुबंई यांच्या निर्देशानुसार तालुका विधी सेवा समितीच्यावतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे पंढरपूर येथे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये 230 प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली आहेत. या प्रकरणामध्ये, एकूण 7 कोटी 21 लाख 30 हजार 818 रुपयांची तडजोड झाली असल्याची माहिती जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे प्रभारी अध्यक्ष श्री. बी. बी. तोष्णीवाल यांनी दिली जिल्हा न्यायालय पंढरपूर येथे दिनांक 9 सप्टेंबर 2023 रोजी या लोकअदालतीमध्ये प्रलंबीत 18 हजार 419 प्रकरणे ठेवण्यात आली होती त्यापैकी 199 प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यामध्ये 6 कोटी 28 लाखांची वसुली झाली. तसेच 2 हजार 750 दाखल पुर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 31 प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यामध्ये 93 लाख रुपयांची वसुली करण्यात आली. अशी एकूण 230 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली आहेत. या लोकअदालतीसाठी एकूण 4 पॅनलची व्यवस्था करण्यात आली होती. या पॅनलमध्ये तदर्थ जिल्हा न्यायाधीश बी. बी. तोष्णीवाल, न्यायाधीश ए. ए. खंडाळे, न्यायाधीश ए. एस. सोनवलकर, न्यायाधीश एम.आर. कामत, यांनी काम पाहिले या अदालतीमध्ये दिवाणी, फौजदारी व मोटार अपघात, कौटुंबीक वादाची न्यायप्रविष्ट प्रकरणे तसेच बँका , महावितरण यांची दाखल पुर्व प्रकरणे, वित्तीय संस्था आदी प्रकरणे ठेवण्यात आली होती.सदरची लोकअदालत प्रथमच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सलमान आझमी, सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेली होती. त्यासाठी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश एम. बी. लंबे यांनी वेळोवेळी बैठका घेवुन, पाठपुरावा करुन संपन्न केली.सदर लोकअदालतीस विधीज्ञ, बॅंक कर्मचारी, न्यायालयीन कर्मचारी, महावितरणचे अधिकारी व पक्षकार मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी पंढरपूर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड. अर्जुन पाटील यांनी प्रस्तावना, व सूत्रसंचालन विधी स्वयंसेवक सुनिल यारगट्टीकर यांनी केले.
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com*