कर्मवीर कॉलेज मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्घाटन संपन्न
पंढरपूर -प्रतिनिधी
कमवा आणि शिका ही जगाला देणगी कर्मवीरांनी दिली असे मत राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्घाटन प्रसंगी . डॉ.एस.एम. भोसले यांनी मांडले. राष्ट्रीय सेवा योजने मधून काम करण्याची संधी मिळते. आव्हान स्वीकारण्याची सवय ही माणसाला पुढे घेऊन जाते.या योजनेच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे हातात घेऊन ती पूर्ण केली जातात. रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर (स्वायत्त) येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. ते पुढे बोलताना म्हणाले की कामाचे वाटप चांगले केले तर उत्तम काम होते . राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून व्यक्तिगत विकास होत असतो. राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक हा पुढे जाऊन चळवळीचा कार्यकर्ता तयार होतो. राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना करण्यामध्ये कर्मवीर अण्णांचे योगदान मोठे होते. शहरी भागातील विद्यार्थी ग्रामीण भागात गेला पाहिजे तेथील समस्याची जाण त्याला आत्मसात झाली पाहिजे राष्ट्रीय सेवा योजनेतील सहभागाने अप्रत्यक्ष अनेक फायदे होत असतात आत्मविश्वास वाढीसाठी उभा राहायला आणि बोलायला शिकवतात. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून राष्ट्र निर्मिती होते असे मत प्राचार्य डॉ. भोसले यांनी मांडले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती प्रा.एस.एम.मोरे यांची होते ते शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मध्ये सदस्य सल्लागार मंडळ राष्ट्रीय सेवा योजना या पदावर कार्यरत आहेत. ते पुढे बोलताना म्हणाले राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो. सामाजिक सेवा करण्याची संधी मिळते स्वामी विवेकानंद यांचे विचार सांगताना परिस्थिती जाणीव असणारी मुले जीवनात यशस्वी होतात असे परखड मत प्रा.मोरे यांनी व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली या उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वाणिज्य विभागाचे उप- प्राचार्य बी.बी. शितोळे होते. ते अध्यक्ष मनोगतामध्ये विद्यार्थी नेमकेपणाने कसा घडवावा महाविद्यालयांमध्ये व्यक्तिमत्व विकासाचा पाया घातला जातो समाज उपयोगी शासकीय योजना यामध्ये आयुष्यमान योजना या विषयावर त्यांनी सविस्तर माहिती दिली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून पाणलोट क्षेत्राचा विकास यामधून केला जातो. राष्ट्रीय सेवेतील विद्यार्थ्यांनी आरोग्य दूध म्हणून काम केले पाहिजे देशाच्या लोकसंख्येत युवकांचे योगदान महत्त्वाचे असते. सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व दिसून येते रयतेच्या विद्यार्थ्याला समाजाचे भान असते असे मत डॉ. शितोळे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे चेअरमन प्रा.डॉ. दत्तात्रय चौधरी यांनी केले होते. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या या उद्घाटनासाठी मोठ्या संख्येने राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रा. श्रीमती सुमन केंद्रे यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेतील सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com