युवराज पतसंस्था यंदा ही ५ हजार कुटुंबाचा दिवाळी सण गोड करणार – चेअरमन उमेश सासवडकर
पंढरपूर तालुका प्रतिनिधी
युवराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पंढरपूर ने गेल्या तीन वर्षापासून त्यांच्या सभासदांची व हितचिंतकांची दिवाळी गोड करण्याचे धारिष्ट दाखवलेले आहे.. यंदाही या दिवाळी सणानिमित्त ५ हजार कुटुंबाला दिवाळी भेट देण्याचे संचालक मंडळाने ठरवलेले आहे.युवराज परिवाराने यापुर्वीही सामाजिक उपक्रम घेऊन व्यावसायिकतेबरोबर सामाजिकता जोपासणण्याचे काम वेळोवेळी केलेले आहे. युवराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पंढरपूर ने महिला दिन, महापुरुषांच्या जयंती व गणेशोत्सव, वृक्षारोपण, गोरगरीब विद्याथ्र्यांना शालेय गणवेशवाटप व इतरही सामाजिक उपक्रम हाती घेऊन ते पार आहेत, याबाबत बोलताना चेअरम न सासवडकर म्हणाले की, युवराज परिवार आता व्यापक स्वरुपात निर्माण होत आहे. संस्थाचालक म्हणुन जबाबदारीदेखील वाढत आहे. एकीकडे पतसंस्थावरील विश्वास हर्तता कमी होत आहे. तर दुसरीकडे विश्वास जिंकुन आपली युवराज नागरी सहकारी पतसंस्थामर्या. पंढरपूर मोठया प्रगल्भतेने पुढे जात आहे.येणारा काळ जरी स्पर्धात्म क असला तरी त्या स्पर्धेतेत आपण उत्तीर्ण होऊ हा विश्वास आहे. कारण, आपल्यासोबत आपल्या संस्थेचे सभासद, हितचिंतक, कर्मचारी व ग्राहक मोठ्या विश्वासाने उभे आहेत. आपली संस्था हि सभासदांनी सभासदांसाठी सभासदांकर्वी चालवत असलेली सहकारी संस्था आहे. सहकारातील प्रत्येक तत्व आपण पाळत आहोत. शिवाय आपले व्यवहार हे पारद र्शकपणाने आपण पार पाडत आहोत. हे सर्व यश आपल्या संस्थेवर विश्वास टाकणाऱ्या प्रत्येक घटकाचे आहे. त्यामुळे सालाबाद प्रमाणे यंदाही सभासदांची दिवाळी गोड करणार आहे परिवारातला प्रत्येक घटक हा परिपूर्ण असायला हावा. त्याला आर्थिक सबलता प्राप्त व्हायला हावी. त्याला व्यवहारिक ज्ञानाबरोबर काटकसरीचे तत्व स्विकारता यायला हावे आणि आपण ज्या संस्थेसोबत निगडीत आहोत. त्या संस्थेची विचारधारा रुजवायला हावी, हा हेतु डोळ्यासम ठेऊन आपण हे कार्य प्रत्येक वर्षी आयोजित करून पार पाडतो. या कार्यात वेळो वेळी सभासद, हितचिंतक, संचालक मंडळ व कर्मचारी वृंद यांच योगदान लाखम लाचे असते. युवराज परिवाराच्या आशा उपक्रमांचे नेहमीच स्वागत समाजामध्ये करण्यात येते. हि या संस्थेची जमेची बाजु आहे. केवळ नफा न पाहता सभासदांचे हित पाहणारी ही संस्था आहे, हे यावरुन दिसून येते.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com