सहकार शिरोमणी कारखान्याच्या गळीत हंगामास प्रारंभ,
कल्याणराव काळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणारच - झुंजार आसबे
भाळवणी प्रतिनिधी
भाळवणी कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे ऊस पुरवठादार शेतक-यांची दिवाळी गोड करण्यासाठी प्रचंड प्रयत्नशील आहेत.यंदाच्या गळीत हंगामात ऊस दराचा पहिला हप्ता इतर कारखान्याच्या बरोबरीने देणार असून ऊस दरात कारखाना व्यवस्थापन मागे राहणार नाही. ऊस पुरवठादार शेतकऱ्यांची मागील देणी देण्यासाठी निधी उपल्बध झाला असून थकित रक्क्म संबंधित शेतकऱ्यांचे खात्यावर जमा करण्यात येईल, असे प्रतिपादन कारखान्याचे कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांनी केले.कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे व्हाईस चेअरमन भारत कोळेकर होते. प्रारंभी पाहुण्यांच्या शुभहस्ते श्रीविठ्ठल व सहकार शिरोमणी वसंतदादांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. गळीत हंगामाचा शुभारंभ ऊस पुरवठादार शेतकरी हणमंत काळे-वेदपाठक, जेष्ठ् सभासद लिंबाजी काटवटे, मधुकर पवार, आब्बासभाई शेख, अर्जुन पासले, धनंजय तळेकर यांच्या शुभहस्ते गव्हाणीत मोळी टाकुन करण्यात आला. तत्पुर्वी संचालक परमेश्वर लामकाने व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.पद्मिणीताई लामकाने या उभयतांच्या शुभहस्ते गव्हाण व काटापुजन करण्यात आले. पुढे बोलताना आसबे म्हणाले, यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व तयारी झालेली असून प्रत्यक्षात आज गळीत हंगामास प्रारंभ झालाआहे. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद शेतकरी, ऊस वाहतुक तोडणी ठेकेदार, कारखान्याचे अधिकारी व कामगारांनी हंगाम यशस्वी करण्यासाठी संपुर्ण सहकार्य करावे, असे आवाहनही आसबे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.समाधान काळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार संचालक नागेश फाटे यांनी मानले.यावेळी राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्ष कृष्णात माळी, कारखान्याचे संचालक मोहन नागटिळक, गोरख जाधव, आण्णा शिंदे, ॲङ तानाजी सरदार, राजाराम पाटील, दिनकर कदम, योगेश ताड, नागेश फाटे, जयसिंह देशमुख, संतोषकुमार भोसले, सुनिल सराटे, अरुण नलवडे, अमोल माने, युवराज दगडे, राजाभाऊ माने, सुरेश देठे, दाऊद शेख, नारायण शिंदे, सर्व सभासद शेतकरी, ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार व कारखान्याचे खातेप्रमुख अधिकारी व कामगार उपस्थित होते.फोटो ओळ :- सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभाप्रसंगी हणमंत काळे-वेदपाठक, जेष्ठ् सभासद लिंबाजी काटवटे, मधुकर पवार, आब्बासभाई शेख, अर्जुन पासले, धनंजय तळेकर, परमेश्वर लामकाने, सौ.पद्मिणी लामकाने, कारखान्याचे व्हाईस चेअरमन भारत कोळेकर,कार्यकारी संचालक झुंजार आसबे, संचालक मंडळ आदि.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com