स्वेरी मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी.
रासेयोच्या वतीने 'राष्ट्रीय एकता दौड' संपन्न
पंढरपूर तालुका प्रतिनिधी श्री संपत लवटे
पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्युटमध्ये भारतातील थोर मुत्सद्दी नेते, भारताचे पहिले गृहमंत्री तथा पहिले उप- पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांची १४८ वी जयंती तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची ३९ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या वतीने सरदार पटेलांच्या जयंतीच्या अनुषंगाने ‘राष्ट्रीय एकता दौड’ चे आयोजन करण्यात आले होते
प्रारंभी लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे यांच्या हस्ते करण्यात आले. लोहपुरूष सरदार पटेल यांच्या जीवनकार्याचे महत्व सांगताना स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे म्हणाले की, ‘सरदार वल्लभभाई पटेल म्हटले की आठवतो तो त्यांचा करारी बाणा! निजामाने आपले राज्य स्वतंत्र राहणार असल्याचे घोषित केल्यामुळे भारत सरकार आणि हैदराबाद राज्यातील जनतेपुढे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला होता. सरदार पटेलांच्या संदर्भात हैद्राबाद आणि गोवा मुक्ती संग्राम या विशेष लक्षात राहणाऱ्या घटना आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी आणि तत्कालीन पंतप्रधान डॉ. राजेन्द्रप्रसाद यांच्याकडून सामाजिकतेची प्रेरणा घेतली. स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतातील सर्व जाती-धर्मातील स्त्रियांना जाचक रुढी आणि परंपरांपासून सुटका मिळावी यासाठी कायद्याचा मसुदा लिहिला. सरदार पटेलांच्या कार्यामुळे स्वातंत्र्यानंतर स्त्री- पुरुष समानतेसाठी हिंदू कोड बिल (हिंदू संहिता विधेयक) याच्यावर शिक्कामोर्तब झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व तर्क आणि नेहरुंचे समर्थन असूनही सुरुवातीस हे बील संविधान सभेत प्राप्त होऊ शकले नाही. त्यामुळे डॉ. आंबेडकरांनी आपल्या पदाचा राजनामा दिला. त्यावेळी पेच प्रसंग निर्माण झाला होता. अखेर पहिल्या लोकसभा निवडणुकीनंतर हे बील संसदेत मंजूर करण्यात आले. ही घटना भारतीय इतिहासात अधोरेखित करण्यासारखी आहे तसेच खंबीर निर्णय घेण्याच्या वृत्तीमुळे आणि धीरोदात्त निर्णय क्षमतेमुळे स्व. इंदिरा गांधी यांची पुण्यतिथीच्या निमित्ताने आज आठवण येते. एकदा रशियाच्या तत्कालीन पंतप्रधानांनी एका कार्यक्रमाकरिता स्व. इंदिरा गांधी यांना रशियाला येण्याचे आमंत्रण दिले. ज्यावेळी इंदिरा गांधी रशियाला गेल्या त्यावेळी तेथे स्वागतासाठी एकही पदाधिकारी उपस्थित नव्हते. हे पाहून स्व. गांधी यांनी रशियामध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या राजदूतच्या घरी जावून त्यांच्या लहान मुलाबरोबर वेळ घालवला. हे जेंव्हा रशियाच्या पंतप्रधानांना समजले त्यावेळी ते खजील झाले आणि आपल्या पदाधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष त्या राजदूताच्या घरी आले आणि दिलगिरी व्यक्त करून स्व. गांधी यांना कार्यक्रमासाठी सन्मानाने नेले. अशा अनेक घटना आहेत की ज्यात स्व. इंदिरा गांधी यांचे खंबीर नेतृत्व असल्याचे दिसून येते.’ असे सांगून त्यांनी सरदार पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तसेच सरदार पटेलांच्या जयंतीच्या निमित्ताने स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून ‘राष्ट्रीय एकता दौड’ चे आयोजन करण्यात आले होते. स्वेरीच्या प्रवेशद्वारा पासून ते मुंढेवाडी पाटी पर्यंत आयोजिलेल्या दौड मध्ये स्वेरीतील सुमारे १५० विद्यार्थी – विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे विश्वस्त एच.एम.बागल, विश्वस्त बी.डी.रोंगे, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मनियार, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे, रजिस्ट्रार राजेंद्र झरकर, प्रशासन अधिष्ठाता डॉ.आर.आर.गिड्डे, प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता प्रा. करण पाटील, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. यशपाल खेडकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. डी.एस.चौधरी व प्रा. रविकांत साठे, एन.एस. एस. चे सर्व महाविद्यालयीन समन्वयक, प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. एस.ए.लेंडवे, इतर प्राध्यापक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
स्वेरीमध्ये भारताचे पहिले उप- पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे सोबत स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, विश्वस्त एच.एम.बागल, विश्वस्त बी.डी. रोंगे, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मनियार, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे, रजिस्ट्रार राजेंद्र झरकर, प्रशासन अधिष्ठाता डॉ.आर.आर.गिड्डे, प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता प्रा. करण पाटील, राष्ट्रीय सेवा रोजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. डी.एस.चौधरी, प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. एस.ए.लेंडवे, प्रा. अविनाश कोकरे व इतर.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com