शिवाजी महाराजांच्या यशाचे गमक हे जिजाऊंच्या संस्कारात – गिरीश जाखोटिया
पंढरपूर प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज हे दैववादी नव्हते म्हणूनच तेस्वराज्याची स्थापना करू शकले. छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण जेंव्हादैवी अवतार ठरवतो. तेंव्हा त्यांनी केलेले कार्य आणि गाजविलेले शौर्य आपणनाकारत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी व्यवस्थापनाचा खूपच खुबीने वापरकेला. म्हणून ते राजे बनू शकले. माँसाहेब जिजाऊ यांचे मार्गदर्शन आणिशहाजीराजे यांची प्रेरणा यामुळेच त्यांनी ‘स्वराज्य’ निर्मिती केली.शिवाजी महाराजांच्या यशाचे गमक हे जिजाऊंच्या संस्कारात दडले आहे.म्हणूनच चारित्र्य संपन्न राजा म्हणून छत्रपती शिवाजींची इतिहासात नोंदआहे.” असे प्रतिपादन थोर मराठी अर्थतज्ज्ञ गिरीश जाखोटिया यांनी केले रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्तमहाविद्यालयात, प्राध्यापक प्रबोधिनीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात‘शिवरायांच्या यशाची दहा सूत्रे’ या विषयावर व्याख्यान देताना ते बोलतहोते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रकांत खिलारे हे होते गिरीश जाखोटिया पुढे म्हणाले की, “छत्रपती शिवाजीमहाराजांच्या आयुष्यातील घटना आणि प्रसंग पहिले तर आपण अचंबित होतो.त्यांनी केलेले कार्य आणि दाखविलेले धाडस याच्या मागे त्यांनी केलेलेसामाजिक व राजकीय व्यवस्थापन होय. सर्वधर्म समभाव, सहिष्णूता, शुद्धचारित्र्य, गुणवत्ता, स्वभावातील लवचिकता, वेळ निभावून नेण्याची सचोटी,परिस्थितीनुसार धोरणात बदल करण्याचा मुत्सद्दीपणा, नवनिर्माण, कल्पकता,वक्तशीरपणा, गुणांची पारख, माणसे ओळखण्याची कला, दूरदृष्टी, नियमाप्रमाणेकठोर भूमिका, विवेकवाद या गुणविशेषणाच्या बळावर शिवाजी महाराजांनीस्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचाच फक्तइंग्रजांना शेवट पर्यंत धाक होता.” या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्राध्यापकप्रबोधिनी समितीचे चेअरमन डॉ. उमेश साळुंखे यांनी केले. या कार्यक्रमासउपप्राचार्य डॉ. भगवान नाईकनवरे, उपप्राचार्य डॉ. बजरंग शितोळे,उपप्राचार्य राजेश कवडे, अधिष्ठाता डॉ. बाळासाहेब बळवंत, अधिष्ठाता डॉ.अनिल चोपडे, सुपरवायझर युवराज आवताडे, कार्यालयीन प्रमुख प्रभाकर पारधी,सिनिअर, ज्युनिअर व व्होकेशनल विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवकबहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सारिकाभांगे यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. एन. के. पाटील यांनी मानले.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com