सामाजिक
अभिजीत पाटील ब्रह्मा, विष्णू महेश यांच्या वेशभूष करत कथेच्या दुसऱ्या दिवशी अवतरले
प्रतिनिधी पंढरपूर
सुप्रसिद्ध शिवपुराण कथा सांगणारे सिहोरचे पंडित प्रदीप मिश्रा यांची सलग दुसऱ्या दिवशी पंढरपूर येथे अभिजीत आबा पाटील यांच्या माध्यमातून होत असलेल्या श्री हरिहर शिव महापुराण आज दुसरा दिवस पार पडला यामध्ये पंढरपूरकरांसह लाखो भाविकांनी गर्दी केली होती..यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांच्या वेशभूषा मध्ये श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी शंकराची वेशभूषा करून हजारोची मने जिंकली..दि.२५ते ३१ डिसेंबर पर्यंत ही कथा दररोज दुपारी १ वाजता होणार असून यजमान श्री.अभिजीत धनंजय पाटील यांनी अधिकाधिक संख्येने भाविकांनी या कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.