पंढरपूर तहसील कार्यालयात ‘राष्ट्रीय ग्राहक दिन “दीनपणाने” साजरा
पंढरपूर श्री नंदकुमार देशपांडे
पंढरपूर – २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून संपूर्ण देशभर शासकीय कार्यालयात उत्साहाने साजरा केला जातो. तो चांगला पध्दतीने साजरा करण्याचे केंद्र व राज्य शासनाचे आदेश आहेत. परंतु ग्राहक हिताचे संरक्षण करण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्या पंढरपूर तहसीलदार कार्यालय, पुरवठा विभागाने तो दिवसही “दीन पणाने” साजरा करुन कामाची झलक दाखविली.याची चौकशी करून संबधितांवर कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.
प्रत्येक वर्षी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यासाठी ग्राहक संघटनेचे पदाधिकारी,चळवळीतील कार्यकर्ते, शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी यांच्यासह नियोजन बैठक घ्यावी अशी पद्धत आहे. शासनाने
ग्राहक दिन संकल्पना (थीम) दिलेली असते.यावर्षासाठी “Consumer Protection in the era of E-Commerce and Digital Trade” अशी थीम आहे. त्याला अनुसरून, त्या विषयीतील तज्ज्ञांच्या वतीने ग्राहक,नागरिकांना सविस्तर मार्गदर्शनाचे आयोजन तसेच विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेणे, विविध शासकीय विभागांचे ग्राहक हिताला अनुसरून, माहितीपर प्रदर्शन आयोजित करणे इ. अपेक्षित असते. तरच ग्राहक दिन साजरा करण्यामागील उद्देश,हेतु साध्य होऊ शकतो. राज्य शासनाने तसे सविस्तर आदेश सर्व जिल्ह्यांना पाठवलेले आहेत.
ग्राहक दिन साजरा करण्याबाबत वेळ, सार्वजनिक ठिकाण,मार्गदर्शक तज्ञ वक्ते याबाबत प्रसिध्दी माध्यमातून काही दिवस आधी जाहीर प्रसिद्धीकरण केले पाहिजे.
कार्यक्रमासाठी सर्व माध्यमांच्या प्रतिनिधींना, नागरिकांना निमंत्रित करणे असे अपेक्षित आहे. मात्र
यापैकी काहीही न करता औपचारिकता म्हणून पंढरपूर तहसीलदार यांच्या दालनात फक्त ठराविक कर्मचारी व अधिकारी अशा बोटावर मोजता येतील एवढ्या मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितित पार पाडून ग्राहकहिताच्या उद्देशाला हरताळ फासण्याचे काम केले आहे. या कामगिरीबद्दल त्याचे “अभिनंदन” केले पाहिजे.
पंढरपूर तालुक्यातील ग्राहक चळवळीचे काम खुप जुने आहे. तालुकास्तरापासून प्रांत पातळीवर काम करणारे कार्यकर्ते, पदाधिकारी येथे काम करत आहेत, हे पुरवठा विभाग, तहसीलदार कार्यालय येथील अधिकारी कर्मचारी यांना माहिती आहे. तरीही एवढी गोपनीयता पाळून राष्ट्रीय ग्राहक दिन उरकला जातो व माहिती कार्यालयामार्फत मान्यवर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतील फोटो प्रसिद्ध केला जातो, या पाठीमागील हेतू काय असावा ? याचा शोध घेण्याची गरज आहे.
अशा पद्धतीने राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यामुळे शासनाच्या ग्राहक प्रबोधन, जागृतीच्या हेतूस हरताळ फासला गेला आहे.
याबाबत चौकशी करून संबंधितांना लेखी समज द्यावी व पंढरपूर तहसील कार्यालयामध्ये पुन्हा एकदा ग्राहक चळवळीतील कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच ग्राहक नागरिकांना सन्मानाने निमंत्रित करून ग्राहक दिन साजरा करण्यात यावा, अशी मागणी प्रांत कोषाध्यक्ष विनोद भरते,सदस्य सुभाष सरदेशमुख, जिल्हा संघटक दीपक इरकल, जिल्हा सचिव सुहास निकते,कार्य.सदस अण्णा ऐतवाडकर तालुका अध्यक्ष विनय उपाध्ये, उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे,संघटक महेश भोसले सचिव धनंजय पंधे यांनी पत्रात केली आहे.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com