राणंद सोसायटीच्या सचिवावर कारवाईची स्वाभिमानीची मागणी
दहिवडी प्रतिनिधी
दहिवडी : ता.२७ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राणंद येथील वि.का.स.सेवा सोसायटीच्या सचिवावर कारवाईची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सहाय्यक निबंधक दहिवडी यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, राणंद गावातील वि.का.स. सेवा सोसायटीचे सचिव हे जाणून बुजून गावातील सभासदांकडून आणि शेतकऱ्यांकडून नियमबाह्य पद्धतीने वसुली करत आहेत. शेतकऱ्यांची ऊसाची बीले थेट कर्जात भरून घेत नियमात बसत नसलेल्या पद्धतीने वसुली करत आहेत. तसेच शेतकऱ्यांनी त्याबाबत विचारणा केली असता शेतकऱ्यांना उद्धटपणे बोलत आहेत. अरेरावीची भाषा करत आहेत. या सचिवांना कुणाचीही भीती नसल्यासारखे शेतकऱ्यांशी व खातेदारांशी ते गैरवर्तन करत आहेत
त्यांना असलेल्या अधिकारांचा गैरवापर करत सर्वसामान्य शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहेत. आपण यावर योग्य ती कारवाई करून सचिवांची तात्काळ बदली करावी किंवा त्यांचे निलंबन करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसात आम्ही शेतकऱ्यांना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत.असा इशाराही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माण तालुकाध्यक्ष राजू मुळीक यांनी सहाय्यक निबंधक दहिवडी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.प्रतिक्रिया :-मग्रूर सचिव नियमबाह्य पद्धतीने कर्जवसुली करत आहे. त्याचसोबत तो सहायक निबंधक मॅडम आपल्याच आहेत, माझं कोणच काय करू शकत नसल्याची भाषा बोलत असल्याने सहाय्यक निबंधक या त्यास पाठीशी घालत आहेत का? असा सवाल शेतकऱ्यांना पडला आहे. याबाबत सहायक निबंधक यांनी योग्य ती कार्यवाही करून त्याची चौकशी करावी आणि कारवाई करावी.—– राजू मुळीक,अध्यक्ष-स्वाभिमानी शेतकरी संघटना,माण.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com