"This news portal adheres to the Digital Media Ethics Code, 2021, established under the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, notified by the Ministry of Information and Broadcasting (MIB). Furthermore, it ensures compliance by submitting mandatory monthly reports to the government as stipulated.

सोलापूर

सक्षम, निर्णायक व वैचारिक व्हा : योगिनी घारे

दक्षिण सोलापूर ( वार्ताहर)

राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी व्यक्तीमत्व विकास साधत असताना मनाच्या सौंदर्याकडे लक्ष द्यावे. तरच आपण सक्षम, निर्णायक, हुशार व वैचारिक व्हाल. असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलसचिव योगिनी घारे यांनी केले. त्या बसवनगर येथील संतोष भीमराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोपप्रसंगी बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळाचे उपाध्यक्ष डॉ.सी.जी. हविनाळे हे होते तर प्रमुख उपस्थिती संस्था सचिव एम डी कमळे, विस्वस्त नागेश बिराजदार, खजिनदार प्रा.व्हि.के.पाटील , सरपंच निखिल राठोड, प्र.प्राचार्य संतोष कदम यांची होती. पुढे बोलताना योगिनी घारे म्हणाल्या की, पालकांचे तीन प्रकार असून त्यापैकी अधिकारशाही चे पालक अधिक प्रेम व विचार देतात. त्यातूनच वैचारिक पाल्ये घडत असतात. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिबिर संयोजक प्रा डॉ भगवान आदटराव यांनी केले. यावेळी सिध्दाराम तरडे व कु. सदफ शेख या शिबिरार्थीनी अनुभव कथन केले. अध्यक्षपदावरुन बोलताना डॉ.हविनाळे म्हणाले की, शिबिरात घेतलेले कष्ट व मेहनत यात सातत्य ठेवावे. तसेच व्याख्यानातून मिळालेला बौध्दिक खुराक हा सर्वांगीण विकासासाठी वापरावा. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मंजुळा खुटाळे हिने केले तर आभार रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ जवाहर मोरे यांनी मानले. शिबिर यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ संतोष कदम, डॉ.शिवानंद तोरवी, डॉ.आर.एम.मोरे., प्रा श्रीमती बी एस कोरे व प्रा डॉ व्हि एन गायकवाड यांनी अथक परिश्रम घेतले शिवाय श्रध्दानंद मठाचे भरत महाराज ,निर्मल पवार, सचिन पवार, सर्व प्राध्यापक, कर्मचारी, ग्रामस्थ व शिबिरार्थी यांचे अनमोल सहकार्य लाभले.

*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!