लहान बालक व पालक यांच्यात संवाद महत्त्वाचा :-अमोल महामूनी
मोहोल ( प्रतिनिधी )
लहान बालक मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे शारीरिक कसरतीचा अभाव निर्माण होत असल्यामुळे खेळांना सर्वाधिक वाव मिळावा या प्रमुख उद्देशाने समाजसेवक राहुल तावसकर यांनी निर्माण केलेला उपक्रम अतिशय कौतुकास्पद असल्याची माहिती सिनेअभिनेते अमोल महामुनी यांनी व्यक्त केली . संत गाडगे महाराज बालोद्यान येथे समाजसेवक राहुल तावसकर यांच्या वाढदिवसाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते. घरातील वयोवृद्ध नागरिक व महिला यांचा बालकाशी संवाद कमी झाल्यामुळे बालक अलिप्त राहत आहेत मोबाईल लाच आपला सखा मानत आहेत विघातक असल्याचे महामूनी यांनी सांगितले. यावेळी बालोद्यांमध्ये आलेले लहान बालक यांच्या समवेत राहुल तावसकर यांनी वाढदिवस साजरा करून या बालकांना खाऊ वाटप करण्यात आला. बाल चमू यांच्यासह उपस्थितांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व पुढे त्यांच्या जीवनात यशस्वी व्हावेत असे परमेश्वराला साकडे घातले.
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com*