उपविभागीय स्तरावर ‘मोडी लिपी’ भाषा अवगत तज्ञाची शासनांनी तात्काळ पर्यायी व्यवस्था करावी
सोलापूर जिल्हा ब्रँड अँबेसिडर राजन घाडगे यांची शासनांस मागणी
मोहोळ तालुका प्रतिनिधी
महसूल उपविभागीय स्तरावर ‘मोडी लिपी’ भाषा अवगत तज्ञाची पर्यायी व्यवस्था करण्याच्या मागणीचे निवेदन सोलापूर जिल्हा ब्रँड अँबेसिडर राजन घाडगे यांनी मोहोळचे निवासी नायब तहसीलदार सुधाकर धाईजे द्वारा मा. ना. एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे करण्यात आली आहे* . मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र काढण्याकरिता सन 1950, 1900, 1861 पर्यंतचे जुने महसुली कागदपत्राची पाहणी करून लाभार्थी अर्जदाराने कागदपत्र अवगत केलेली आहेत. 1861 च्या कालखंडातील मोडी लिपी भाषेतील कागदपत्रे सक्षम प्राधि अधिकार्याकडून प्राप्त केलेली आहेत. सक्षम प्राधि अधिकार्याकडून प्राप्त कागदपत्राच्या पुराव्याच्या आधारावर अर्जदारांनी संबंधित तहसील प्रशासनाकडे पुराव्यानिशी प्रस्ताव दाखल केले जात आहेत. उपविभागीय स्तरावरून मोडी लिपी भाषा अवगत तज्ञाकडून प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक असल्याने प्रस्तावांना त्रुटीमुळे प्रस्ताव प्रलंबित राहत आहेत. केवळ मोडी लिपी भाषा अवगत नसल्यामुळे अर्जदाराचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. मोडी लिपी भाषा अवगत तज्ञाची महसूल उपविभागीय तथा प्रांत स्तरावर आवश्यक ठिकाणी मे. शासनांनी पर्यायी व्यवस्था तात्काळ करावी अशी मागणी घाडगे यांनी केली आहे.
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com*