सामाजिक

आ. आवताडे यांच्या मार्गदर्शनात अबॅकस स्पर्धेतील यशवंतांचा गुणगौरव सोहळा संपन्न

पंढरपूर तालुका प्रतिनिधी

डॉ.वृषाली पाटील यांच्या वतीने सत्कार
दिनांक 24 फेब्रुवारी रोजी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार समाधान दादा अवताडे यांच्या मार्गदर्शनात व डॉ.वृषाली पाटील यांच्या सौजन्याने अनघा प्रो ऍक्टिव्ह अबॅकस सोलापूर येथे झालेल्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा अध्यक्षा डॉक्टर प्राजक्ता बेणारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला विवेक पूर्व प्राथमिक विद्यालयाच्या संचालिका सौ आशा जमदाडे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. डॉ. वृषाली पाटील ज्योती जोशी ,जयश्री क्षीरसागर, अपर्णा तारखे, सुप्रिया काकडे ,रोहिणी कस्तुरे तसेच अनघा प्रो ऍक्टिव्ह अबॅकस च्या संचालिका सरिता मुढे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते समर कॉम्पिटिशन स्पर्धेत अचूक गणिते सोडवून अनघा प्रो ऍक्टिव्ह अबॅकस च्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत घवघवीत यश मिळवले आहे त्यांना आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनात मान्यवरांच्या हस्ते विशेष पारितोषिक आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले.


अबॅकस स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये चाणक्यपणा वाढतो तसेच गणित सोडवण्याची विद्यार्थ्यांची क्षमता देखील वाढते त्यामुळेच अनघा प्रो ऍक्टिव्ह अबॅकस सेंटरच्या काम कौतुकास्पद आहे असे कौतुकोद्गार प्रमुख पाहुणे अशा जमदाडे यांनी काढले. त्यांनी मातीला आणि दगडाला आकार देऊन त्यातून एक आकर्षक मूर्ती बनवण्याचे काम जसे केले जाते तसेच अनघा प्रो ऍक्टिव्ह अबॅकस सेंटरचे काम आहे असे मनोगत व्यक्त केले .आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉक्टर प्राजक्ता बेणारे यांनी विद्यार्थ्यांना टीव्ही व मोबाईल वापरण्यामुळे होणारे फायदे तोटे सांगितले.
मंचावरील इतर मान्यवरांनी देखील मनोगत व्यक्त करताना अनघा अबॅकस सेंटरचे कौतुक केले
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सारिका मुढे यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय भोसले मॅडम यांनी करून दिला.
अनघा प्रो ऍक्टिव्ह अबॅकस सेंटरला आमदार समाधान आवताडे हे वेळो वेळी मार्गदर्शन करत असतात त्यांच्या मार्गदर्शनातच हा उपक्रम राबवला असून अशा उपक्रमातून अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीत मोलाची भर पडते. आमदार समाधान दादा अवताडे यांचे अशा कार्यक्रमाला नेहमीच सहकार्य असते त्यामुळे आमदार समाधान आवताडे यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवर तसेच पालकांचे संचालिका सरिता मुढे यांनी शेवटी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!