आवताडे शुगरने ३१ जानेवारी पर्यंतचे सर्व ऊस बिल केले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा- संजय आवताडे
मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील आवताडे शुगर ॲण्ड डिस्टीलरीज प्रा. लि नंदुर ता.मंगळवेढा या कारखान्याचे चालू गळीत हंगामातील ३१ जानेवारी २०२४ पर्यंत गाळप केलेल्या सर्व ऊसाचा पहिला हप्ता २७११ रुपये प्रमाणे संबधित ऊस पुरवठादार शेतकऱ्याच्या बँक खात्यावर वर्ग करणेत आलेले आहेत. तरी शेती विभागाकडील कर्मचाऱ्याकडून ऊस बिलाची पावती घेऊन संबधित बँकेतून ऊस बिलाची रक्कम घेऊन जावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन संजय आवताडे यांनी केले आहे.यावेळी बोलताना चेअरमन संजय आवताडे म्हणाले की आवताडे शुगर चा हा दुसरा हंगाम सुरू असून पहिला हंगाम आम्ही यशस्वीरित्या पूर्ण केला. तसेच दुसऱ्या हंगामामध्येही शेतकऱ्यांनी आवताडे शुगर वर विश्वास दाखवून मोठ्या प्रमाणात ऊस कारखान्याला पुरवठा केलेला आहे शेतकऱ्यांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासास आम्ही कधीही तडा जाऊ देणार नसून शेतकरी हितासाठीच हा कारखाना आम्ही सुरू केला आहे. चालू हंगामात आवताडे शुगरने ३ लाख ९२ हजार ४६० मे टन उसाचे गाळप आज अखेर केले असल्याचेही सांगितले. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी मा.कुर्मदास चटके व कार्यकारी संचालक मा. मोहन पिसे उपस्थीत होते.फोटो- संजय आवताडे